Join us

शिव ठाकरे सध्या करतोय काय? 'या' शोमध्ये घेणार वाईल्ड कार्ड एन्ट्री! चाहत्यांमध्ये उत्सुकता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 13:44 IST

शिव ठाकरे जवळपास प्रत्येक रिएलिटी शोमध्ये दिसला आहे.

अमरावतीचा वाघ, मराठमोळा शिव ठाकरे (Shiv Thakare) आपल्या साधेपणामुळे कायमच प्रेक्षकांचं मन जिंकतो. साधा स्वभाव पण पाहिजे तिथे सडेतोड बोलणार अशा शिव ठाकरेने मराठी बिग बॉसची ट्रॉफीही जिंकली होती. यानंतर तो 'खतरो के खिलाडी', 'बिग बॉस हिंदी'सह अनेक रिएलिटी शोजमध्ये दिसला. पण सध्या शिव नक्की काय करतोय असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर त्याची आता आणखी एका रिएलिटी शोमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.

शिव ठाकरे रिअॅलिटी शो मास्टर आहे. जवळपास प्रत्येक शोमध्ये तो दिसला आहे. सध्या टीव्हीवर 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' (Celebrity Masterchef) ची लोकप्रियता आहे. फराह खान शोची होस्ट आहे. रणवीर ब्रार आणि विकास खन्ना हे रिअल लाईफ शेफ या शोमध्ये परीक्षक आहेत. निक्की तांबोळी, उषा नाडकर्णी, तेजस्वी प्रकाश, दीपिका कक्कर, गौरव खन्ना, फैजल शेख, अर्चना गौतम, चंदन प्रभाकर, अभिजीत सावंत हे स्पर्धक दिसले. काही दिवसांपूर्वीच शोमधून दीपिका कक्करने वैयक्तिक कारणांमुळे एक्झिट घेतली. इंडिया फोरमच्या रिपोर्टनुसार, आता दीपिकाच्या जागी शिव ठाकरेची शोमध्ये एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. शिवची चाहत्यांमधील लोकप्रियता पाहता तो मेकर्सने त्याला ऑफर दिली आहे.शिव ठाकरे शोमध्ये येणार याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दीपिका कक्कर शेवटच्या दिवशी भावुक झालेली दिसली. तिचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. शिव ठाकरे जर आला तर काय रंगत येते हे बघण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

टॅग्स :शीव ठाकरेटेलिव्हिजनटिव्ही कलाकारफराह खान