मंडप घातला, मांडव सजला! 'शिवा' फेम अभिनेत्याची लगीनघाई, होणाऱ्या पत्नीने शेअर केले ग्रहमखाचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 10:33 AM2024-12-11T10:33:47+5:302024-12-11T10:37:33+5:30
'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता शाल्व किंजवडेकरची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे फोटोदेखील समोर आले आहेत.
सध्या कलाविश्वात लग्नाचे वारे वाहत आहेत. एकामागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. दिवाळीनंतर अनेक सेलिब्रिटींनी मुहुर्त गाठला असून 'शिवा' फेम अभिनेताही बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहे. 'शिवा' मालिकेत मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता शाल्व किंजवडेकरची लगीनघाई सुरू आहे. त्याच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली असून याचे फोटोदेखील समोर आले आहेत.
शाल्व किंजवडेकर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. शाल्व गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरसोबत लग्नगाठ बांधणार आहे. त्यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. नुकतंच त्यांचा ग्रहमख विधी पार पडला. याचे फोटो श्रेयाने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये श्रेयाने डोक्याला मुंडावळ्या बांधल्याचं दिसत आहे. तर शाल्वच्या घरीही लग्नाची जय्यत तयारी सुरू आहे. त्याच्या घरी लग्नाचा मांडव घातला असून घराला विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी शाल्व आणि श्रेयाने साखरपुडा केला होता. मोठ्या थाटामाटात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. शाल्व किंजवडेकरची होणारी पत्नी श्रेया ही व्यवसायाने फॅनन डिझायनर आहे. सोबत ती स्टायलिस्ट असून तिचं स्वतःचं फॅशन लेबलसुद्धा आहे. शाल्व व श्रेया सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. तर शाल्व लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या 'शिवा' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या शाल्वला 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतून प्रसिद्धी मिळाली होती.