Join us

'काहे दिया परसेदस'मधील शिव-गौरी हनिमुनसाठी पोहचले स्वित्झरर्लंडला

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2017 3:08 PM

हिंदी सिनेमाप्रमाणेच परदेशात शूटिंग करण्याचा ट्रेंस हिंदी मालिकांमध्ये तुफान गाजतोय. काही मालिकांमध्ये स्वित्झरर्लंड,ऑस्ट्रीया सारख्या देशातील रम्य लोकेशन या हिंदी ...

हिंदी सिनेमाप्रमाणेच परदेशात शूटिंग करण्याचा ट्रेंस हिंदी मालिकांमध्ये तुफान गाजतोय. काही मालिकांमध्ये स्वित्झरर्लंड,ऑस्ट्रीया सारख्या देशातील रम्य लोकेशन या हिंदी मालिकेत पाहायला मिळाले.आता हाच ट्रेंड मराठीतही रूळ पाहतोय. कारण मराठीत सुपरहिट ठरलेली मालिका काहे दिया परदेसचेही शूटिंग आता स्विज्झर्लंड येथे करण्यात आले.'काहे दिया परदेस' मालिकांआधी  यापूर्वीही निर्माता – दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘तुझं माझं जमेना’ या मालिकेचे शूटिंग स्वित्झर्लंडला करण्यात आले होते.अशाप्रकारे परदेशात शूट होणारी ही पहिलीच मराठी मालिका आहे. हीजवळापास १२५ भागांचीच ही मालिका होती. स्वित्झर्लंडव्यतिरिक्त मालिकेचं बाकीचं शूटिंग पुण्यात करण्यात आले होते. उत्तर भारतीय शिव आणि मुंबईची मुलगी गौरी यांच्या प्रेमकथेला रसिकांची भरभरून पसंती मिळतेय. दोन संस्कृतीचा, दोन परंपरांचा उत्कृष्ट मिलाफ या मालिकेच्या माध्यमातून रसिकांना अनुभवता आला. मग ते शिवचे मुंबईत येऊन राहणे असो, दोघांचे प्रेमात पडणे असो, दोघांच्या घरुन लग्नाला संमती मिळवण्यासाठीची कसोटी असो किंवा मुंबईच्या गौरीने बनारसच्या सासरच्यांना प्रेमाने जिंकणे असो. सगळ्या टप्पयांवर शिव गौरी यशस्वी ठरले आहेत. अखेर दोघांचं लग्न तर झालं पण प्रेमकथेच्या या वेगवेगळ्या संघर्षमय वाटेवर वाटचाल करत असताना शिव गौरी प्रेमाच्या क्षणांपासून दुरावले होते.दोघं हनिमूनला कुठे जाणार त्यांना घरच्या या अनेक अडचणींमधून बाजूला होऊन हनिमूनला जाता येईल की नाही याची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते.दोघांची प्रेमकथा आता बहरणार आहे.कारणहे दोघेही स्वित्झरर्लंडच्या नयनरम्य निसर्गात एकमेकांसोबत रोमँटीक क्षण घालवतायेत.त्यामुळे स्विझर्लंडमध्ये शीव आणि गौरीचा रोमँटीक अंदाज पाहणे रसिकांसाठी रंजक ठरणार आहे.