Join us

आशु अन् नेहाची लग्न पत्रिका पाहून शिवा खुश! लग्नात काय धुमाकूळ घालेल शिवा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 17:44 IST

'शिवा' मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाची शहनाही वाजताना दिसणार आहे.

झी मराठीवरील 'शिवा' मालिकेत लवकरच आशु आणि नेहाच्या लग्नाचे सनई चौघडे वाजताना दिसणार आहे.  सीताई आणि कीर्ति खुश आहेत पण रामभाऊ, लक्ष्मण आणि उर्मिला नाराज  आहेत. या सगळ्यात शिवा खुश आहे कारण म्हणतेय आशु काय करतोय हे त्याच त्याला कळत नाहीये पण मला माहितेय, आता हळू हळू माझ्याबद्दलच्या त्याच्या मनात असलेल्या भावना अजून छान प्रकारे त्याला जाणवतील.  शिवा, मांजा आणि इतर सगळ्यांना बजावते की आशुशी नीट वागायचं! या सगळ्यात दिव्या, शिवाला आणि नेहाला एकत्र बघते.

इकडे रामभाऊ शिवाकडे जाऊन तिच्यासाठी काही करू शकत नाहीत म्हणून तिची माफी मागतात. शिवा व पाना गॅंग मिळून त्यांची समजूत काढतात. दरम्यान रस्त्यावर एक बाई आजारी पडलेय शिवा आणि आशु मिळून तिला वाचवतात. आशुच्या लग्नाची पत्रिका छापून येते. मंदिरात पत्रिका ठेवायच्या वेळेस आशु, सीताई , शिवा समोरासमोर येणार आहेत. याच दरम्यान किर्तिच्या चुकीमुळे तिकडे एक भांडण होत त्यातला एकजण सीताईच्या अंगावर जातो मग मात्र शिवा त्याला धडा शिकवते. इकडे नेहा मुद्दाम शिवाने केलेल्या सर्व गोष्टी आशुसाठी करतेय. ज्यामुळे आशुला शिवाची अजूनच आठवण येते . दुसरीकडे चंदन दिव्याच्या पैशांचा सोर्स शोधतो.  दिव्या आणि कीर्ति मिळून शिवाची नाचक्की करण्याचा अजून एक प्रयत्न करतात पण शिवा तो हाणून पाडते. आशु आणि नेहाच्या लग्नात काय धुमाकूळ घालेल शिवा याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारझी मराठी