'शिवा' (Shiva Serial) मालिकेत शिवा आणि आशूच्या लग्नानंतरचे सोहळे सुरुच आहेत आणि त्यातलीच एक परंपरा आहे ती म्हणजे नवदाम्पत्याचे देव दर्शन. आशु-शिवा सुद्धा मंदिरात देवदर्शनासाठी पोहचले आहेत. त्याचवेळेस तिथे चंदन- दिव्याही येतात. मंदिराच्या पायऱ्या चढत असताना शिवाचा तोल जातो पण आशू तिला सावरतो.
इथे तर आशुने, शिवाला सावरले पण सीताई समोर शिवाची बाजू कोण घेईल. तिच्या पाठीशी कोण उभं राहील. मंदिरात गोत्र विचारल्यावर शिवाची तारंबळ उडते आणि सीताईला शिवावर रागवायची अजून एक संधी मिळते. पण यावेळी भाऊ शिवाला सांभाळून घेतात. शिवाने पूजेसाठी बनवलेला प्रसाद उत्तम झाला आहे असे गुरूजी सांगताच रामभाऊंच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. रामभाऊ शिवाने पहिली परीक्षा पार केली म्हणुन तिचं कौतुक करतात. तर शिवा आणि आशुला एकत्र पाहून दिव्याची खूप चिडचीड होते.
मंदिराच्या परिसरात गुरुजी भेटतात. गुरूजी दुर्गेच्या रूपातील सून मिळाली असं सर्वांसमोर सांगतात. हीच मुलगी तुमच्या मुलासाठी योग्य असल्याचं भाकीत खरं ठरल्याचं गुरूजी आठवण करून देतात आणि शिवाला बाजूला घेऊन दोघांमधले गैरसमज संपले की नातं एकदम सुंदर होईल असे सांगतात. शिवा आशुला मित्र बनून राहूया असा सल्ला देते. आशू आणि शिवा यांच्यात गडबड होते आणि ते एकमेकांच्या अंगावर पडतात. शिवा संसाराची कसोटी यशस्वीपणे पार करू शकेल ? शिवाला, ह्या नवीन आयुष्यात आशुच्या मैत्रीची साथ लाभेल का? शिवा-आशुच लग्न झालाय हे कळल्यावर दिव्या काय करेल? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.