Join us  

...तर 'बिग बॉस मराठी' होस्ट करताना दिसले असते शिवाजी साटम, म्हणाले- "मला महेशने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 01, 2024 11:59 AM

बिग बॉस हा खेळ मी बघूच शकत नाही... असं का म्हणाले शिवाजी साटम?

बिग बॉस (Bigg Boss) हा शो हिंदीत लोकप्रिय झाल्यानंतर २०१८ साली मराठीतही सुरु झाला. बिग बॉस मराठीचा पहिला पर्व चांगला गाजला. मेघा धाडे पर्वाची विजेती ठरली. अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी शो होस्ट केला होता. यानंतर पुढील तीन सीझनही त्यांनीच होस्ट केले होते. दरम्यान एकदा त्यांची तब्येत बरी नसताना त्यांनी  'सीआयडी' फेम अभिनेते शिवाजी साटम (Shivaji Satam) यांना शो होस्ट करण्याची ऑफर दिली होती.

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत शिवाजी साटम म्हणाले, "खरं सांगायचं तर जेव्हा हिंदीत बिग बॉस सुरु झालं तेव्हा मी ते पाहिलं नव्हतं. नंतर ते मराठीतही सुरु झालं. तेव्हा महेश माझा मित्र आहे आणि तो होस्ट करतोय म्हणून मी फक्त पहिला सीझन त्याला पाहण्यासाठी लावलं होतं. माझं लक्ष केवळ महेशवर होतं. परदेशातील बिग ब्रदर या शोवरुन आपल्याकडेही बिग बॉस सुरु करण्यात आलं. आपल्याच घरात, आपल्या खाजही आयुष्यात लोक डोकावणार हे बघताना लोकांना आनंद मिळत असेल. पण हा माझा स्वभाव नाही. मी मुळीच बघणार नाही. सोशल मीडियावरही जरी चुकून आलं तरी मी ते पुढे ढकलतो."

ते पुढे म्हणाले, "एका सीझनला महेशची तब्येत बरी नसताना त्याने एक आठवडा होस्ट करशील का म्हणून मला विचारण्यात आलं होतं. मी तेव्हा त्याला नाही सांगितलं होतं. मी करु शकणार नाही. तो इतकं छान करतो, त्याच्या पद्धतीने सुंदर करतो. मला त्याचं होस्टिंग आवडायचं, तो स्टेजवर गंमतीजमतीही करायचा. तो स्वत: शोही बघायचा. मला वैयक्तिकरित्या हा शो एवढा एक्सायटिंग वाटत नाही. तो शो चांगलाच नाही असं मी म्हणत नाही पण मला करायची इच्छा नाही. म्हणून मी ही ऑफर नाकारली होती."

टॅग्स :शिवाजी साटमबिग बॉस मराठीमहेश मांजरेकर टेलिव्हिजन