'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या लोकप्रिय कार्यक्रमातून अनेक कलाकार प्रसिद्धीझोतात आले आहेत. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे शिवाली परब (Shivali Parab). मूळची सावंतवाडीची असणारी शिवाली परब हास्यजत्रेच्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. दरम्यान आता एका मुलाखतीत तिने निमिषसोबतच्या अफेयरच्या चर्चांवर मौन सोडले आहे.
शिवाली परब सध्या एका गाण्यामुळे चर्चेत आली आहे. हार्टबीट वाढणार हाय असे या गाण्याचे बोल आहेत. या गाण्याच्या निमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत तिने अफेयरच्या चर्चांवर आपलं मत व्यक्त केले आहे. मीडिया टॉल्क मराठी या युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल सांगितले की, सहकलाकाराबरोबर नाव जोडलं जायचं त्याची आधी मला या गोष्टीची भीती वाटायची. आई बाबा काय बोलतील, असे विचार मनात यायचे. कारण, सोशल मीडियावर फक्त चाहते किंवा आई-बाबा नाही तर आपलं संपूर्ण कुटुंब, आपल्या पालकांचे मित्र-मैत्रिणी देखील असतात. अशावेळी आमच्या फोटोंवर अनेक कमेंट्स वगैरे येतात. असेच माझ्या आणि निमिषच्या बाबतीत झाले. आम्ही एका स्कीटमध्ये काम केले होते. त्यानंतर आमच्या अफेयरच्या चर्चा सुरू झाल्या.
आता या चर्चांची खूप सवय झालीय
शिवाली पुढे म्हणाली की, खरेतर, मी आणि निमिष आधीपासून मित्र आहोत. आम्ही एकत्र एकांकिका वगैरे केल्या आहेत. त्यामुळे आमच्यात एक छान बॉण्डिंग आहे. आमछे हेच बॉण्डिंग ऑनस्क्रीन खूप छान दिसचे. त्यामुळे आमच्या फोटोंवर कमेंट्स येतात, चर्चा होतात. पण, आम्ही खूप चांगले मित्र आहोत. आमच्या नावाची चर्चा सुरू झाल्यावर मी एकदा निमिषला माझ्या आई-वडिलांना भेटायला बोलावले होते. त्यांची भेट झाली मग, त्यांनाही समजले हे फक्त चांगले मित्र-मैत्रिणी आहेत. त्या दिवसापासून मी ठरवले की आता लोकांना काहीही बोलू दे. माझ्या आई वडिलांना माहित आहे ना…हा माझा मित्र आहे हे माझ्यासाठी पुरे आहे. पण, आता या चर्चांची खूप सवय झाली आहे.
कमेंट्स करणे ही प्रत्येकाची मते असतात यावर आपण काहीच करू शकत नाही. यानंतर मी आणि निमिषने एकदा आगाऊपणा सुद्धा केला होता. आम्ही सेल्फी काढून सोशल मीडियावर शेअर केला होता आणि डेट विथ निब्बा वगैरे लिहिले होते. पुढे, दोन दिवस यावर चर्चा चालू होती. पण, माझ्या खऱ्या आयुष्यात काय चालू आहे, याबद्दल खरी माहिती कोणालाच नाही. हे एक खूप चांगले आहे. असे शिवाली म्हणाली. वर्कफ्रंट..
डान्सर बनायला आलेल्या शिवाली परबने कला क्षेत्रात येण्यापूर्वी एका सरकारी नोकरीसाठी अर्ज केला होता. परीक्षासुद्धा दिली होती. मात्र तिच्या आयुष्यात युथ फेस्टिव्हल टर्निंग पॉईंट ठरला. या युथ फेस्टिव्हलमुळे तिला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. एका स्किटदरम्यान अभिनेत्री नम्रता आवटेने तिला पाहिले होते. तिचा अभिनय पाहून नम्रताने तिला महाराष्ट्राची हास्यजत्रासाठी बोलवले होते. अशाप्रकारे या लोकप्रिय कार्यक्रमात शिवालीला काम करण्याची संधी मिळाली.