Join us

'ये रिश्ता..' फेम शिवांगी जोशी चढणार बोहल्यावर ? 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्याशी करणार लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2024 1:56 PM

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी हिनं इंडस्ट्रीमध्ये खास ओळख निर्माण केली आहे.

'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम शिवांगी जोशी हिनं इंडस्ट्रीमध्ये खास ओळख निर्माण केली आहे. या मालिकेतून शिवांगी घरोघरी "नायरा" या नावाने ओळखली जाते. यातच आता शिवांगी बोहल्यावर चढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अभिनेत्री तिच्यापेक्षा 14 वर्ष मोठा असलेल्या अभिनेत्याशी लग्न करणार असल्याचं बोललं जातं आहे. 

शिवांगी ही  "बरसातें- मौसम प्यार का' या मालिकेतील तिचा सहकलाकार कुशल टंडनच्या प्रेमात पडल्याची माहिती समोर आली आहे. कुशल टंडन आणि शिवांगी रिलेशनशिपमध्ये असून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. दोघेही लवकरच लग्न बंधनात अडकरणार असल्याचा चर्चा आहेत. शिवांगी आणि कुशल यांच्यात वयाचा खूप फरक आहे. कुशल हा शिवांगीपेक्षा वयानं 14 वर्षांनी मोठा आहे. 

कुशलच्या पास्ट रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर तो आधी गौहर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. तर शिवांगी हिनं मोहसिन खानला डेट केलं होतं. पण काही काळानंतर त्या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे म्हटले जाऊ लागले. आता शिवांगी किंवा कुशाल त्याच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याच्या विचारात आहेत. लग्नाच्या बातमीवर शिवांगी किंवा कुशालनं दुजोरा दिलेला नाही. त्यामुळे आता या बातमीत किती सत्य आहे आणि किती अफवाह आहे याविषयी ते दोघेच सांगू शकतात. 

शिवांगी तिच्या सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांची यादीही खूप मोठी आहे. शिवांगी जोशी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते.  सोशल मीडियावर ती आपले नवनवीन फोटो शेअर करत असते. चाहतेही तिच्या या फोटोंवर कौतुकाचा वर्षाव करतात. शिवांगी जोशी आज टीव्हीच्या सर्वात महागड्या आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. कोटींची मालकीण शिवांगी जोशी आलिशान आयुष्य जगते.  

टॅग्स :सेलिब्रिटीटेलिव्हिजन