'बिग बॉस ओटीटी 3' ची सुरुवात झालीय. 'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये हळूहळू एकएक करुन स्पर्धकांची एन्ट्री झालीय. दिल्लीच्या व्हायरल वडापाव गर्लची 'बिग बॉस ओटीटी 3'च्या घरात पहिल्यांदा एन्ट्री झाली. पुढे अभिनेता रणवीर शोरे 'बिग बॉस ओटीटी 3' च्या घरात दाखल झाला. 'बिग बॉस ओटीटी 3' ची तिसरी स्पर्धक आहे शिवानी कुमार. शिवानीच्या साध्या तरीही रोखठोक स्वभावाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये शिवानी कुमारने लक्ष वेधलं
'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये शिवानी कुमारची एन्ट्री झाली. शिवानी कुमार एका छोट्याश्या मातीच्या भांड्यातून गावाची माती घेऊन आलीय. याशिवाय इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांची तिला चीड आहे. शिवानी एन्ट्री केल्यापासूनच तिच्या खास हिंदी भाषेत अनिल कपूर आणि इतरांशी बोलताना दिसतेय. शिवानीची ओळख घरातील नवी स्पर्धक सना खानसोबत झालं. सना आणि शिवानी यांच्यात हिंदी-इंग्रजी भाषेवरुन शाब्दिक जुगलबंदी झालेली दिसतेय. पुढे शिवानी घरात आली. तिला झोपायला सिंगल बेड हवा होता. परंतु इतरांनी सिंगल बेड आधीच अडवले होते. पुढे शिवानीने बिग बॉसला विनंती केली की, "बिग बॉस प्लीज मला सिंगल बेड द्या. मी झोपताना लाथा मारते. मी घरी पण बेडवर एकटीच झोपते." अशाप्रकारे शिवानीच्या निरागस साधेपणाने सर्वांची मनं जिंकली.
'बिग बॉस ओटीटी 3' ची ग्रँड सुरुवात
'बिग बॉस ओटीटी 3' ची उत्सुकता शिगेला आहे. या वेळी सलमान खान नव्हे तर अनिल कपूर 'बिग बॉस ओटीटी 3'चं सूत्रसंचालन करणार आहेत. त्यामुळे अनिल 'बिग बॉस ओटीटी 3' चं सूत्रसंचालन कसं करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. Bigg Boss OTT 3 #AbSabBadlega आज २१ जूनपासून JioCinema Premium वर रात्री ९ वाजता बघू शकता