Join us

'अप्पी आमची कलेक्टर'मध्ये अप्पीची भूमिका साकारणारी शिवानी म्हणाली-हि भूमिका....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 11:43 AM

'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. शिवानीने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे.

झी मराठी वाहिनीवर 'अप्पी आमची कलेक्टर' हि नवीन मालिका २२ ऑगस्ट ,संध्याकाळी ७:०० पासून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ह्या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक स्मॉल स्क्रीनवर पदार्पण करत आहे. शिवानी ने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे.

 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन मिळत नाही.पण तिचं ध्येय खूप मोठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे. प्रोमो पाहून चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे

 प्रोमोमध्ये सगळ्यांनी अप्पी ला पाहिलं आणि या भूमिकेतूनदेखील शिवानी प्रेक्षकांचं भरघोस प्रेम मिळवणार आहे. या मालिकेबद्दल व आपल्या भूमिकेबद्दल बोलताना शिवानी म्हणाली कि, "ही मालिका एक वेगळा विषय घेऊन येत आहे. मी ह्या मालिकेत अपर्णा सुरेश माने ची भूमिका साकारत आहे . तिचे बाबा रिक्षा चालवतात.तिचा छान घर आहे आणि  त्या घरात आई , बाबा आणि भाऊ राहतात. तीच एक स्वप्न आहे कलेक्टर व्हायचं आहे आणि ते ती कस साध्य करते हा तिचा प्रवास दाखवणार आहे.

हे मालिकेतून प्रेक्षकांना हळू हळू उलगडत जाईल. अप्पी सामाजिक आणि कौटुंबिक अडचणींचा सामना करून काही तरी करू पाहते आणि हि भूमिका माझासाठी खूप प्रेरणादायी आहे. ह्या भूमिकेसाठी मी खूप मेहेनत घेते आहे आणि मालिका प्रेक्षकांना आवडेल अशी अपॆक्षा ठेवते." 

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकार