बिग बॉस मराठीच्या घरामध्ये शिवानीची एन्ट्री झाली आणि सगळ चित्रच बदल. नेहा आणि माधवला तिच्या येण्याने खूप आनंद झाला. तर प्रत्येक सदस्याने ती घरात येण्याने पॉझिटिव्हीट आली आहे आणि एक उत्तम खेळाडू घरामध्ये परत आली आहे असे सांगितले. आता नक्की कोणाला किती आनंद झाला आहे ? नक्की सदस्यांचे मत काय आहे ? हे लवकरच कळेल... कालच्या विकेंडच्या डावमध्ये शिवानी सुर्वेनीवीणा जगतापकडे जाब मागितला होता कि, पराग आणि तुझ बोलण सुरु असताना जेव्हा पराग म्हणाला, मी हिला नादाला लावणार तेव्हा तू अस म्हणालीस, ती तशीच आहे तशी म्हणजे कशी याच उत्तर मला हवं आहे... आणि याच मुद्यावरून आज शिवानी आणि वीणामध्ये चर्चा रंगली आहे. ज्यामध्ये शिवानीने वीणाला सांगितले, तो जो मुद्दा सुरु होता वीणा तो पटवण्यावरती सुरु होता, आणि त्यावर तुझे म्हणणे होते मी बाहेरून तिच्याबद्दल ऐकले आहे ती तशीच आहे. त्यावर वीणा म्हणाली, पण मी तुझ्या चारित्र्या बद्दल काहीच नाही बोले... त्यावर शिवानी म्हणाली, जर तुझ्या बहिणीबद्दल हे घडलं असत इकडे या शोमध्ये आणि मी म्हटलं असते ती ना तशीच आहे, पटेल ती तुला...ते बाहेर याच पद्धतीने गेलं... जेव्हा आपण असे काही बोलतो तेव्हा तुला माहिती नाही काय जाणार आणि काय नाही जाणार ? आणि अशा गोष्टी जाणार बाहेर, का नाही जाणार ? तू एक मुलगी असून माझ्याबद्दल असं बोली आहेस... तू माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उभं केलस वीणा...
इतकचं नाही तर शिवानीने वीणाला ती कुठे चुकते आहे हे देखील सांगितले. शिवानीने वीणाला सांगितले, “तू एकच गोष्ट परत परत बोलतेस, त्यामुळे तुझा आवाज नकोसा वाटतो... मी तुला खर सांगते, माझ्या घरी किंवा माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये तुझा आवाज आला कि, टीव्हीचा आवाज बंद करतात किंवा वाहिनी बदलतात. मी तुझ खच्चीकरण नाही करत आहे पण तुला ही गोष्ट सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. जसं तुला नाही आवडत तुला शिकवलेले तस मलाही नाही आवडणार ना मला शिकवलेल... वीणाने तिला सांगितले मी तुला शिकवत नव्हते तेंव्हा तुला मैत्रीण म्हणून समजवत होते... त्यावर शिवानीने सांगितले, तुझ काय होत आहे सगळ्यांना तू काही बोलू नकोस, हळू बोल, हे नको करुस, शिव्या नको देऊस अस सांगतेस... तू टीचर नाहीयेस इकडची वीणा”... यावर वीणा मला मान्य आहे असे देखील म्हणाली... पण आता कितपत तिला हे समजले आहे ? तिच्यामध्ये काही बदल होईल ? तिला हे खरच हे मान्य आहे का ? हे लवकर कळेलच.