कलर्सच्या लेटेस्ट प्रस्ताव इंटरनेटवाला लव्हने प्रेक्षकांपुढे या इंटरनेट वेड्या पिढीची एक नव्या दमाची आणि वेगळी कथा सादर केली आहे त्यातील प्रमुख पात्रे जय (शिवीन नारंग) आणि आद्या (तुनिशा शर्मा) यांच्या नजरेतून. जय हा इंटरनेटच्या आहारी गेलेला असल्यामुळे तो स्वच्छंदी जीवनशैली जगत आहे. तो एक खेळकर वृत्तीचा आरजे असल्यामुळे सोशल मिडिया त्याच्यावर लक्ष ठेवून असते आणि तो त्याचा आनंद घेत आहे. त्याच्या अगदी विरूध्द स्वभावाची आद्या साधे जीवन जगत आहे आणि ती सोशल मिडिया पासून कटाक्षाने लांब रहाते. प्रेमात पडण्यासाठी आद्याचा जुन्या शाळकरी मार्गावर विश्वास आहे तर आरजे जयला वाटते की तो ऑनलाइन क्लिक द्वारे प्रेमात पडेल.
या पात्राच्या अंतरंगात शिरण्यासाठी शिवीन अतिशय परिश्रम करत आहे. विश्वासार्ह रेडिओ जॉकीची भूमिका साकारण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तयारीसाठी त्याने नुकतीच रेडिओ स्टेशनला भेट दिली आणि आरजे बनण्यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेची माहिती करून घेतली. शिवीने काही प्रख्यात आरजेकडून त्याच्या भूमिकेसाठी प्रशिक्षण सुध्दा घेतले. या बातमीला दुजोरा देत शिवीन नारंग म्हणाला, “ मला वाटते की आरजे बनणे ही दुसऱ्या कशाहीपेक्षा जास्त सर्जनशील काम आहे. या नव्या भूमिकेसाठी मी अतिउत्सुक आहे आणि मी नुकतेच रेडिओ स्टेशनला भेट देणे चालू केले आहे आणि आरजेंच्या वेगवेगळ्या कामाच्या कौशल्यासाठी त्यांच्याशी बोलत आहे. मला माझ्या आरजे मित्रांनी दिलेल्या सूचनांचा मी नक्कीच वापर करणार आहे, कारण त्यामुळे मला माझे पात्र अतिशय चांगल्या पध्दतीने साकारता येणार आहे. इंटरनेटवाला लव्ह ही एक वेगळी संकल्पना असून त्यात आधुनिक पिढीची व्याख्या बदलणारा वास्तवतेचा स्पर्श आहे. ही माझ्या करियर मधील एक कुतुहलजनक अवस्था असून मला खात्री आहे की हा शो आमच्या प्रेक्षकांना नक्की आवडेल.”