'बिग बॉस 14' ची विजेती रुबिना गेल्या काही दिवसापासून वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. बिग बॉस ची विजेती बनल्यापासून तिच्यात खूप ऍटिट्यूड आल्याचे बोलले जात आहे.
नुकताच तिचा एक व्हिडिओ समोर आला होता.या व्हिडिओत मीडिया फोटोग्राफरलाही तिने दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले.
या व्हिडिओमध्ये तिच्यावर साऱ्यांनीच टीका केली.चुकीच्या व्यक्तीला आम्ही विजेता बनवले.अशा प्रतिक्रिया या व्हिडिओ वर उमटल्याचे पाहायला मिळत आहे.
आता पुन्हा एकदा रुबिना चर्चेत आली आहे. बिग बॉस मध्ये सहभागी झालेले सगळेच स्पर्धक राखी सावंतच्या आईला भेटून आले.मात्र अजूनपर्यंत रुबिना काही भेटायला गेली नाही...त्यामुळे पुन्हा एकदा तिच्यावर नेटिझन्सनी निशाणा साधला आहे.
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपण रुबीनाला अनेकदा कॉल करूनही तिनं माझ्या फोनचं उत्तर न दिल्याचा खुलासा राखीनं केला होता. राखीची आई रुबिनाची पूर्वीपासूनच चाहती होती.
बिग बॉसच्या घरातली आवडती स्पर्धक होती. त्यामुळे अनेकदा राखीला रुबीना विषयी विचारताना दिसायची.
राखी सावंतने हे गोष्ट सांगितली होती. तसेच आता रुग्णालयमध्ये असूनही आईने रुबीना विषयी विचारणा केली होती.
मात्र राखीचा साधा फोनही रुबीनाने उचलला नाही. राखीने बिझी शेड्युलमधून थोडासा वेळ काढून माझ्या आईला भेटायला या किंवा तिच्याशी व्हिडीओ कॉलवर बोला अशी विनंतीच रूबिनाला केली आहे