Join us

Shocking! कॅन्सरने गेल्या दोन महिन्यात चार कलाकारांचा केला घात, क्राइम पेट्रोलच्या अभिनेत्याचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 11:31 AM

मागील गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत कॅन्सरमुळे तीन कलाकारांना गमाविल्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्याचे निधन झाले आहे.

मागील गेल्या दोन महिन्यांपासून आतापर्यंत कॅन्सरमुळे तीन कलाकारांना गमाविल्यानंतर आता आणखीन एका अभिनेत्याचे निधन झाले आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो क्राइम पेट्रोलमधील अभिनेता शफीक अन्सारी यांचे निधन झाले आहे. शफीक गेल्या काही काळापासून कॅन्सरशी सामना करत होते. सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन यांनी याबाबतची माहिती ट्वीटरवरून दिली. 10 मे ला शफीक यांनी अखेरचा श्वास घेतला.CINTAAने अभिनेत्याच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या. 2008 पासून शफीक अन्सारी या असोसिएशनचे सदस्य होते. टेली चक्करच्या रिपोर्टनुसार शफीक यांचे निधन स्टमक कॅन्सरमुळे झाला. मागच्या बऱ्याच काळापासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

शफीक अन्सारी क्राइम पेट्रोलमध्ये प्रमुख भूमिका साकारत होते. याशिवाय ते या शोचे असिस्टंट डायरेक्टर आणि लेखक सुद्धा होते. तसेच त्यांनी 2003 साली आलेला सुपरहिट सिनेमा 'बागबान'साठी स्क्रिन रायटिंग केली होती. या सिनेमात हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांच्या मुख्य भूमिका होत्या.

एप्रिल महिन्याच्या अखेरीस बॉलिवूडने कॅन्सरमुळेच दोन कलाकार गमावले आहेत. 29 एप्रिलला अभिनेता इरफानचे न्यूरोएंडोक्राइन या कॅन्सरमुळे निधन झाले. तर त्याच्याच दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ अभिनेता ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. ऋषी कपूर सुद्धा मागच्या दोन वर्षांपासून कॅन्सरशी लढा देत होते. ‘पीके’, ‘रॉक ऑन’ यासारख्या बॉलिवूडपटांमध्ये झळकलेला अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे 10 मे रोजी अमेरिकेत निधन झाले. गेल्या दोन वर्षांपासून मेंदूच्या कर्करोगाशी तो सामना करत होता.

टॅग्स :टेलिव्हिजनक्राइम पेट्रोलकर्करोग