Join us

धक्कादायक! मराठी अभिनेत्याला ब्रेन हॅमरेजचं निदान, उपचारातून सावरत म्हणाला- "गेले ६-७ महिने मी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2024 09:24 IST

मराठी मालिका आणि नाटकविश्वातील लोकप्रिय अभिनेत्याला ब्रेन हॅमरेज झाल्याने सर्वांनाच धक्का बसलाय (atul todankar)

मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार विविध आजारांना सामोरं जावं लागतं. मनोरंजन विश्वातून अशीच एक धक्कादायक घटना समोर येतेय. ती म्हणजे, मराठमोळा अभिनेता अतुल तोडणकरला ब्रेन हॅमरेज झालाय. अतुलने स्वतः पोस्ट करत ही दुःखद बातमी सर्वांना सांगितलीय. अतुल गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिका, नाटक, सिनेमा अशा विविध माध्यमांत कार्यरत आहे. अतुलने ब्रेन हॅमरेजबद्दल सांगितल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

अतुलने पोस्ट करुन सांगितली कहाणी

अतुल तोडणकर लिहितो, "हि पोस्ट शेअर करण्यामागे खास कारण आहे.. बरेचदा आपल्या आजारपणाची योग्य आणि उत्तम ट्रीटमेंट कुठे मिळेल हे माहित नसतं आणि एकदा का वेळ निघून गेली की आपल्या हाती काहीही उरत नाही, म्हणून हा पोस्ट प्रपंच.. माझे दोन वाढदिवस आहेत. एक जन्मदिवस आणि दुसरा पुनर्जन्म दिवस.. नाटक - मालिका - सिनेमा या तीनही क्षेत्रात उत्तम काम चालू होतं.. आणि अचानक 21 जानेवारी 2024 ला " एका लग्नाची पुढची गोष्ट " या नाटकाच्या पुण्याच्या प्रयोगादरम्यान मला शारीरिक अस्वासथ्याला सामोरं जावं लागलं, ब्रेन हॅमरेज झालं..सगळं थांबलं आणि जवळपास सगळं संपल्याची जाणीव झाली."

अतुल तोडणकर पुढे लिहितो, "परमेश्वराची कृपा, आईवडील, बायको- मुलगा, सर्व रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादामुळे आणि योग्य वेळेत मिळालेल्या उपचारामुळे यातून ठणठणीत बरा झालो.पण त्याकरता 6-7 महिने पूर्ण आराम आणि उपचार घ्यावे लागले आणि सर्वात महत्वाचे...सर्वोत्तम उपचार मिळाले. आमच्या चंदेरी दुनियेत काम करताना अवेळी जेवण, कामाच्या मोकाट वेळा, अपुरी झोप व आराम यामुळे तुमची शरीर प्रकृती आतून पोखरत जाते आणि असा अचानक विस्फोट होतो जो दुर्दैवाने माझ्या बाबतीत झाला.

अतुल शेवटी लिहितो, "आम्ही सगळेच कलावंत आपापली काळजी घेत असतोच. जिम, योगा, मेडिटेशन, स्किन आणि केसांची काळजी घेत असतोच पण अंतर्गत शरीर स्वच्छता करायचं विसरतो. मी 7 दिवसात माझ्या शरीराची अंतर्गत स्वच्छता करून आलो. आणि माझी प्रकृती कमालीची सुधारलीय.. वर्षातून किमान 7 दिवस तरी स्वतःच्या तब्येतीसाठी द्यायचेच." ही पोस्ट लिहून अतुलने ज्यांच्याकडून उपचार घेतले त्या प्रकृती रिसॉर्टचे आभार मानले आहेत. अतुल उपचारातून बरा होऊन पुन्हा अभिनय क्षेत्रात सक्रिय होईल, याची सर्वांना आशा आहे.

टॅग्स :मराठीमराठी अभिनेता