Join us

Shocking : गौरव चोपडा बिग बॉस शोमधून आउट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 8:05 PM

बिग बॉस सिजन-१० मध्ये आतापर्यंत बरेचसे एविक्शन झाले. मात्र या आठवड्याचे एविक्शन प्रेक्षकांना अचंबित करणारे ठरले. बिग बॉसच्या या ...

बिग बॉस सिजन-१० मध्ये आतापर्यंत बरेचसे एविक्शन झाले. मात्र या आठवड्याचे एविक्शन प्रेक्षकांना अचंबित करणारे ठरले. बिग बॉसच्या या सिजनचा सर्वाधिक स्ट्रॉँग कंटेस्टेंट गौरव चोपडा याने बिग बॉसला बॉय केले आहे. त्यामुळे घरातील सदस्यांबरोबरच प्रेक्षकांना धक्का बसला आहे. }}}} ">http://गेल्या दोनआठवड्यांपासून मोनालिसा, बानी जे आणि गौरव चोपडा घरातून बाहेर पडण्यासाठी नॉमिनेट झाले होते. मात्र एक आठवड्यापूर्वी प्रियंका जग्गा हिला वादग्रस्तरीत्या घराबाहेर काढल्याने त्या आठवड्यात एकही सदस्य घराबाहेर पडला नाही. परंतु बिग बॉसने गेल्या आठवड्यातील नॉमिनेट स्पर्धक या आठवड्यातही कायम ठेवले होते. त्यामुळे या आठवड्यात मोनालिसा घराबाहेर पडणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. कारण बानी जे आणि गौरव चोपडा यांच्या तुलनेत मोनालिसा फारसी स्ट्रॉँग समजली जात नव्हती. मात्र घराबाहेर पडणाºया सदस्यांमध्ये गौरवचे नाव पुढे आल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. बिसनेस आॅफ सिनेमाच्या रिपोर्टनुसार सलमान खान याच्या वीकेण्ड का वॉर या एपिसोडमध्ये गौरव चोपडा नव्या वर्षाच्या सुरुवातीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. खरं तर या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कोणीच घराबाहेर पडणार नसल्याचे शोच्या निर्मात्यांनी स्पष्ट केले होते. परंतु अचानकच या निर्णय बदल्याने प्रेक्षकांना धक्का बसला आहे. गौरव चोपडा हा बिग बॉसच्या घरातील अतिशय चाणाक्ष असा स्पर्धक होता. अतिशय चलाखीने तो प्रत्येक डाव खेळायचा. बानी जे हिच्याबरोबरचे त्याचे प्रेमप्रकरण सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरले. सुरुवातीला त्याला बानीचा सहवास पसंत नव्हता. त्यामुळे तो तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र नंतरच्या काळात त्यानेही तिच्याशी जवळीकता निर्माण केली होती. मात्र ही जवळीक केवळ खेळाचा भाग असल्याचे त्याच्यापासून कधीच लपून राहिले नाही. शिवाय सेलिब्रेटींमधून तो सर्वात समजूतदार स्पर्धक असल्याने या शोचा विजेता म्हणून त्याच्याकडे बघितले जात होते. मात्र अचानकच त्याला घरातून बाहेर पडावे लागल्याने सगळ्यांनाच याचा धक्का बसला आहे. दरम्यान बिग बॉसने त्याची घरातून एक्झिट अतिशय रोमांचक करण्याचा प्रयत्न केला. बानी जे सोबतच्या त्याच्या आठवणी अतिशय हटके अंदाजात प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे घरातील सर्वच सदस्य भावूक झाले होते. दरम्यान, गौरव घराबाहेर पडल्याने बानी जे एकाकी पडणार हे जवळपास निश्चित समजले जात आहे. कारण बानीचे घरात कोणाशीच जमत नसल्याने अन्य सदस्य तिला टार्गेट करण्याची शक्यता आहे. सेलिब्रेटींमध्ये लोपामुद्राशी तिची दुश्मनी दिवसेंदिवस अधिकच गडद होत असल्याने ती खेळात कशा पद्धतीने स्वत:ला सिद्ध करणार हे बघणे औत्सुक्याचे ठरेल.