Join us

​Shocking: टीव्ही अभिनेत्री श्रृति उल्फतला झाली या कारणामुळे अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 5:27 AM

अतिउत्साहाच्या भरात कोण काय करेल याचा नेम नाही असाच प्रकार टीव्ही अभिनेत्री श्रृती उल्फतसह घडला आहे.'नागार्जुन एक योध्दा'मधील अभिनेत्री ...

अतिउत्साहाच्या भरात कोण काय करेल याचा नेम नाही असाच प्रकार टीव्ही अभिनेत्री श्रृती उल्फतसह घडला आहे.'नागार्जुन एक योध्दा'मधील अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक करण्यात आली आहे. सोशल मीडियावर श्रुतीचा कोबरा सापाबरोबरचा व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होत आहे. काल रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्रुती उल्फतसह चार जणांना अटक केली आहे. वन्य जीव अधिनियमाचे उलंघन केल्याच्या आरोपाखाली या चार जणांना अटक कऱण्यात आली आहे. या व्हिडीओत श्रृती कोब्राला हातात पकडून तिचा आनंद व्यक्त करताना दिसतेय. कोब्रा कोणत्या जातीचा आहे याविषयी ती एका माणसाकडून माहितीदेखील घेताना दिसते. तर या व्हिडीओत तिने चक्क गळ्यातच कोब्रा घेतला असून मस्तीच्या मुडमध्ये दिसतेय. इतकेच नाहीतर श्रृतीच्या शेजारी एक बालकलाकारही उभी असल्याचे दिसते. एका वृत्तानुसार काही पशु कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर मुंबई प्रादेशिक विभागाच्या वन अधिकाऱ्यांनी अभिनेत्री श्रुती उल्फतला अटक केली आहे. तसेच त्या चार जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.व्हायरल झालेला व्हिडिओ ऑक्टोबर 2016 मध्ये मालिकेच्या प्रमोशनसाठी तयार करण्यात आला होता. मात्र  अतिउत्साहाच्या भरात श्रुतीने हा  व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यात तिने कोबरा हातात घेतल्याचे दिसतेय, त्यामुळे तो अधिकच व्हयरल झाला. व्यवस्थापन टीमच्या मते कोबऱा सापाच्या शूटिंगचा  व्हिडिओ स्पेशल इफेक्टसचा वापर करुन  तयार करण्यात आला होता.  त्यामध्ये कोणताही जिंवत कोबरा नव्हाता आम्ही शूटिंगसाठी कोणत्याही नियमाचे उल्लंघन केले नसल्याचे मालिकेच्या टीमने सांगितले आहे. दरम्यान, वन विभागाने सोशल मीडियावरील तो व्हिडिओ डाऊनलोड करुन कलिना येथिल फॉरेंसिक लॅबला परिक्षणासाठी पाठवला होता. 17 जानेवारी रोजी त्याचा रिपोर्ट मिळाला त्यामध्ये व्हिडिओ मध्ये दिसणारा हा साप एनिमेटेड नसून खरा खुरा  जिंवत साप शूटिंगसाठी वापरण्यात आल्याचे म्हटेल आहे. तसेच श्रृतीसह अटक करण्यात आलेल्या  चारही जणांनीनीही याची कबुली दिली आहे.त्यासाठी त्यांना  न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.