Shocking : स्वामी ओमचा पुन्हा बकालपणा; व्हिडीओ बघाल तर दंग व्हाल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 11:30 AM
बिग बॉस सिझन १० चा सर्वाधिक वादग्रस्त कंटेस्टेंट स्वयंघोषित बाबा स्वामी ओम चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही बकाल वक्तव्य करीत असतो. काल-परवापर्यंत सलमान खान आणि बिग बॉसच्या निर्मात्यांना जिवे मारण्याची धमकी देणाºया स्वामी ओमने यावेळेस भलताच दावा केला आहे.
बिग बॉस सिझन १० चा सर्वाधिक वादग्रस्त कंटेस्टेंट स्वयंघोषित बाबा स्वामी ओम चर्चेत राहण्यासाठी नेहमीच काही ना काही बकाल वक्तव्य करीत असतो. काल-परवापर्यंत सलमान खान आणि बिग बॉसच्या निर्मात्यांना जिवे मारण्याची धमकी देणाºया स्वामी ओमने यावेळेस भलताच दावा केला आहे. यावेळेस त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ अपलोड केला असून, त्यामध्ये उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये भूकंपाचे झटके आणण्यामागे दुसरं-तिसरं कोणीही नसून खुद्द स्वामी ओम असल्याचा दावा केला आहे. अर्थात हा व्हिडीओ नेहमीप्रमाणे हास्याचा विषय ठरत आहे. बिग बॉसच्या शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या स्वामी ओमची शोमधील जर्नी खूपच वादग्रस्त आणि संतापजनक राहिली आहे. शोमधून हकालपट्टी केल्यानंतर बाहेरच्या दुनियेतही स्वामी ओमने अक्षरश: कहर केला आहे. रोज काहीतरी नवा कारनामा करून स्वामी ओम चर्चेत आहे. यावेळेस लोक त्याच्यावर टीका करीत असल्यानेच उत्तराखंड आणि दिल्लीमध्ये भूकंप आला असल्याचा दावा त्याने केला आहे. विशेष म्हणजे स्वत:ला देव म्हणविणाºया स्वामी ओमने जगाचा विनाश करणार असल्याचीही बतावणी केली आहे. स्वामी ओमच्या या व्हिडीओचा लोकांकडून जबरदस्त समाचार घेतला जात असून, स्वामी ओमला अक्षरश: शिव्यांची लाखोली वाहिली जात आहे. सध्या हा व्हिडीओ यू-ट्यूबवर जबरदस्त व्हायरल झाला आहे. स्वामी ओमने या व्हिडीओमध्ये म्हटले की, मी शिवपुत्र आहे. त्यामुळेच गेल्या सोमवारी दिल्ली आणि उत्तराखंडमध्ये भूकंपाचे झटके आले होते. भगवान शिवने बिग बॉसच्या घरात त्यांना अपमानास्पद वागणूक देणाºया लोकांना ही एकप्रकारची शिक्षाच दिली आहे. स्वामी ओम एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे बोलताना म्हणाला की, जर लोकांनी खिल्ली उडविणे थांबविले नाही तर नेपाळप्रमाणे एक भयानक भूकंप येईल व सर्वत्र विनाश होईल, अशी धमकीही दिली आहे. मात्र स्वामी ओमच्या या धमकीला भीक न घालता लोकांनी अक्षरश: या व्हिडीओचं हसू केलं आहे. त्याचबरोबर स्वामी ओमवर रोषही व्यक्त केला आहे. बिग बॉसच्या घरातून स्वामी ओमची रोहन मेहरा आणि बानी जे यांच्या तोंडावर स्वत:ची लघवी फेकल्या कारणाने हकालपट्टी करण्यात आली होती. घराबाहेर पडल्यानंतर स्वामी ओमने सलमान खानवर गंभीर आरोप केला होता. सलमान हा आयएसआय एजंट असल्याचे स्वामी ओमने म्हटले होते. त्याचबरोबर बिग बॉसच्या घराला आग लावणार असल्याची धमकीही दिली होती. मात्र त्याच्या या सर्व धमक्या पोकळ ठरल्या आहेत. आता पुन्हा असाच विचित्र कारनामा करून स्वामी ओम चर्चेत आला आहे.