Join us

धक्कादायक ! 'फुलाला सुगंध मातीचा'मधील या अभिनेत्रीने सोडली मालिका, कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 18:15 IST

Phulala Sunghandh Maticha Serial : 'फुलाला सुगंध मातीचा' या मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिका सोडली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर रंगली आहे‌.

स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sunghandh Maticha Serial) ही मालिका गेल्या अनेक दिवसापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. या मालिकेत सध्या किर्तीची आयपीएसची खडतर ट्रेनिंग सुरू झालेली आहे. आता या मालिकेमध्ये नवीन वळण आले आहे.या मालिकेमध्ये अनेक भूमिका प्रेक्षकांच्या आवडीच्या आहेत. मात्र आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने ही मालिका सोडली असल्याची चर्चा सध्या काही दिवसांपासून रंगत आहे.

फुलाला सुगंध मातीचा या मालिकेतील एका अभिनेत्रीने मालिका सोडली असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर होत आहे‌. ही अभिनेत्री नेमकी कोण आहे याबद्दलही अनेकांना उत्सुकता लागली आहे. या मालिकेमध्ये जान्हवीची भूमिका देखील प्रेक्षकांना प्रचंड आवडलेली आहे. जान्हवीची भूमिका भूमीजा पाटील (Bhumija Patil) हिने साकारली आहे. भूमीजा पाटील हिने‌ ही मालिका सोडली असे सांगण्यात येत आहे. याचे कारणही समोर आले आहे. 

भूमिजा पाटील आता लवकरच सन मराठीवर सुरू होणाऱ्या माझी माणसं या मालिकेत दिसणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. या मालिकेचा प्रोमो देखील सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या मालिकेमध्ये रात्रीस खेळ चाले या मालिकेत काम केलेला साईंकीत कामत तर अभिनेत्री जानकी पाठक हीदेखील प्रमुख भूमिकेत आपल्याला दिसणार आहे. ही मालिका मिळाल्याने भूमीजा पाटील हिने फुलाला सुगंध मातीचा ही मालिका सोडली असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :स्टार प्रवाह