छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचा १२ वा सीझन सातत्याने चर्चेत येतो आहे. शोमधील कॉन्ट्रोव्हर्सी, कंटेस्टंटचे लव्ह अफेयर्स मुळे चर्चेत येत आहे. नुकतेच इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझनचा विजेता अभिजीत सावंतने रिएलिटी शोवरील नाराजी व्यक्त केली आहे. इतकेच नाही तर त्याने सीझन ११मध्ये झालेल्या कित्येक गोष्टी खोट्या असल्याचं म्हणत रिएलिटी शोचा पर्दाफाश केला आहे.
बॉलिवूड लाइफला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सावंतने शोमध्ये सामिल केल्या जाणाऱ्या एक्स्ट्रा एलिमेंटवर वक्तव्य केले. तो म्हणाला की, शोमध्ये कंटेस्टंटच्या परफॉर्फन्सवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी दुसरीकडे भरकटताना दिसते आहे. आमच्या वेळी दुसऱ्या गोष्टींना कमी प्राधान्य दिले जात होते मात्र आज या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रीत केले जाते. जेव्हा तुम्ही इतर गोष्टींना जास्त महत्त्व देता तेव्हा सिंगिंगची पातळी घसरते. ही सर्वात मोठी समस्या आहे. आपल्याला सिंगिगवर जास्त वेळ दिला पाहिजे.अभिजीत सावंतने इंडियन आयडॉलच्या निर्मात्यांना म्हटले होते की, कंटेस्टंटची ट्रॅजिक स्टोरीऐवजी गायनावर फोकस केले जाते. हल्ली निर्माते स्पर्धकांच्या टॅलेंटपेक्षा जास्त त्यांच्या स्टोरीवर लक्ष केंद्रीत करतात की तो किती गरीब आहे किंवा हा शूज पॉलिश करतो. प्रेक्षकांबाबत अभिजीत सावंतने म्हटले होते की, प्रेक्षकांना ड्रामा खूप आवडतो. त्यामुळेच निर्माते प्रेक्षकांना अवाक करण्याचा प्रयत्न करतात.