Join us

'आई कुठे काय करते'मध्ये धक्कादायक वळण, यशवर नीलच्या खुनाचा आरोप, होणार त्याला जेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 1:59 PM

Aai Kuthe Kay Karte : यशवर नीलच्या खुनाचा आरोप लागणार आहे. त्यामुळे आता देशमुख कुटुंबीय त्याला कसा निर्दोष सिद्ध करणार हे महत्त्वाचं ठरणार आहे.

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. कधी देशमुखांच्या घरात आनंदाचे क्षण येतात तर काही वेळा सतत भांडणतंटे होत असल्याचं दिसून येतं. यामध्येच आता घरातील रोजच्या वातावरणापासून दूर इशा, यश आणि गौरी त्यांच्या मित्रांसोबत फिरायला गेले आहेत. मात्र, या पिकनिकमध्ये त्यांचा मित्र नील इशावर जबरदस्ती करतो. त्यामुळे संतापलेला यश त्याला मारतो आणि यात त्याच्या मृत्यू होतो.

सोशल मीडियावर समोर आलेल्या प्रोमोमध्ये यश नीलला मारताना दिसतोय. यात नीलच्या डोक्यावर लागतं आणि तो खाली पडतो. यावेळी त्याला केदार येऊन थांबवतो. यश त्याला मारु नको म्हणत केदार त्याच्या हातातला दांडा घेतो. 

केदार पाणी आणायला सांगतो. रात्रीच्या अंधारात फोटो काढायचं आमिष दाखवून तो तिला एकांतात घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्ती करायला लागला. मात्र, योग्यवेळी यश पोहोचल्यामुळे इशाची नीलच्या तावडीतून सुटका झाली. परंतु, इशाला सोडवण्याच्या नादात यशने नीलच्या डोक्यावर जोरात प्रहार केला आहे. यात त्याचा मृत्यू झाल्याचं मित्र म्हणतात. आता यशवर नीलच्या खुनाचा आरोप लागणार का?, यशला तुरुंगात जावं लागणार का?, देशमुख यशला कसं निर्दोष सिद्ध करणार हे पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे.  

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकास्टार प्रवाह