Join us

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये धक्कादायक वळण, गौरी जयदीपला सांगणार दुसरं लग्न करायला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2022 1:09 PM

Sukh Mhanje Nakki Kay Asata: गौरी आणि जयदीप यांच्या आयुष्यात नवीन वादळ येणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asata)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत सध्या धक्कादायक वळण आले आहे. या मालिकेतील सर्वांची आवडती जोडी गौरी आणि जयदीप यांच्या आयुष्यात नवीन वादळ येणार आहे. गौरी आई बनणार नसल्याचे समजते. त्यानंतर आता त्यावर गौरी तोडगा काढत जयदीपला दुसरे लग्न करण्यास सांगते आहे.

नुकताच सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. यात पाहायला मिळत आहे की, गौरी मानसीला सांगताना दिसते आहे की मी ठरवलं आहे की जयदीपला दुसरं लग्न करायला लावायचे. त्यानंतर गौरी जयदीपसाठी मुलगी शोधायला सुरूवात करते आणि जयदीप हे पाहतो की ऑनलाइन त्याच्या नावाचं प्रोफाइल सुरू केले आहे. त्यावर जयदीप गौरीला बोलतो की, हे काय करते आहेस. त्यावर गौरी बोलते की हे तू याआधी माझ्यासाठी केले आहेस. जयदीप तू दुसरं लग्न कर. तू अशा मुलीशी लग्न कर जी तुला बाप बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकेल. हे ऐकून जयदीपला धक्का बसतो. आता जयदीप गौरीला समजवेल की तो गौरीचे ऐकेल हे पुढील भागात पाहायला मिळेल.

नुकत्याच प्रसारीत झालेल्या भागात शालिनी देवकीला गौरी विरोधात काय बोलायचे हे सांगते. त्यानुसार देवकी गौरी आई होऊ शकत नाही आहे म्हटल्यावर बोलते की, जयदीपने ज्योतीसोबत लग्न केले असते तर बरे झाले असते आणि देवकी बरंच काही गौरीला सुनावते. त्यानंतर गौरीला खूप वाईट वाटते आणि तिच्या डोक्यात जयदीपला दुसरे लग्न करायला सांगायचे हे सूचते. 

टॅग्स :स्टार प्रवाह