स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. नुकतेच मालिकेत खरी गौरीचे पुन्हा शिर्केपाटील कुटुंबात स्वागत होते. अनिल आणि मानसी यांना त्यांच्या चुकीसाठी शिक्षा होते. तसेच कंपनीची सर्व धुरा दादासाहेब जयदीपच्या हाती सोपवतात. दरम्यान आता शिर्केपाटील कुटुंबासमोर धक्कादायक सत्य समोर येणार आहे. त्यानंतर ते पेचप्रसंगात सापडणार आहेत.
मालिकेत नुकतेच पाहायला मिळाले की, रंगा अम्माला सर्व सत्य सांगेन अशी धमकी देऊन ५ लाख रुपयांची मागणी करतो. तिला घाबरवण्यासाठी तो रात्री शिर्केपाटील यांच्या बंगल्यात येतो. तेव्हा पाणी आणण्यासाठी गेलेली गौरी त्याला पाहते आणि चोर चोर अशी ओरडते. त्यावेळी तो हळूच गौरीच्या कानाजवळ मी कोण आहे हे अम्माला विचार असे बोलतो. त्यानंतर चोर चोर असे ओरडून घरातल्यांना बोलवते. पण तोपर्यंत तो पळून जातो. गौरी घरच्यांना तो कानात काय बोलला हे सांगत नाही. ती दुसऱ्या दिवशी अम्माला विचारते. त्यावर अम्मा तिला मी त्याचा हिशोब करते असे सांगते. मात्र पुन्हा रंगा अम्माला धमकी देऊन भेटायला बोलवतो. अम्मावर देवकी आणि शालिनी पाळत ठेवून पाठलाग करतात. अम्मा रंगाला भेटते तो तिच्याकडे पाच लाख रुपये मागतो. रंगाला काहीतरी आजार झाला आहे आणि त्याच्याकडे वेळ कमी असल्याचे सांगतो.