सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी होणार शिर्केपाटील कुटुंबाची नवी मालकीण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 07:20 PM2022-07-04T19:20:00+5:302022-07-04T19:20:00+5:30

Sukh mhanje nakki kay asata: एकेकाळी शिर्केपाटील कुटुंबात मोलकरीण म्हणून काम करणारी गौरी जयदीपसोबत लग्न करुन या घराची सून होते. परंतु, आता ती या घरची लेक असल्याचं समोर आलं आहे.

shocking turn in tv show sukh mhanje nakki kay asata gauri and mai | सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी होणार शिर्केपाटील कुटुंबाची नवी मालकीण

सुख म्हणजे नक्की काय असतं: गौरी होणार शिर्केपाटील कुटुंबाची नवी मालकीण

googlenewsNext

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata). गेल्या कित्येक दिवसांपासून शिर्केपाटील कुटुंबात अनेक उलथापालथ सुरु असल्याचं पाहायला मिळात होतं. एकाच वेळी दोन जयदीप समोर उभे राहिल्यामुळे या मालिकेला एक वेगळं वळण मिळालं होतं. यामध्येच आता मालिकेत पुन्हा एक ट्विस्ट आला आहे. शिर्केपाटील कुटुंबात आतापर्यंत सून म्हणून राहणारी गौरी या घराची लेक असल्याचं सत्य समोर आलं आहे.

एकेकाळी शिर्केपाटील कुटुंबात मोलकरीण म्हणून काम करणारी गौरी जयदीपसोबत लग्न करुन या घराची सून होते. इतकंच नाही तर सून झाल्यानंतरही तिच्या अडचणी काही कमी होत नाहीत. या घरात तिला अनेक संकटांचा सामना करावा लागला. मात्र, आता गौरी या घराची सून नसून घरची लेक असल्याचं सत्य समोर आलं आहे.

दरम्यान, जयदीप आणि गौरी यांच्या खऱ्या आई-वडिलांचं सत्य अम्मा शिर्केपाटील कुटुंबाला सांगते. यात जयदीप सूर्यादादांचा मुलगा असून गौरी तुमची लेक असल्याचं ती सांगते. तिच्या या खुलाशामुळे घरातील प्रत्येकाला धक्का बसतो. मात्र, माई, गौरीला तिची लेक म्हणून स्वीकारते आणि मोठ्या थाटात आपल्या लेकीचं स्वागत करते. इतकंच नाही तर ती यापुढे शिर्केपाटील कुटुंबाची मालकीण असेल असं घोषित करते. परंतु, यामध्येही शालिनी आता नवा डाव रचणार असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या मालिकेत नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: shocking turn in tv show sukh mhanje nakki kay asata gauri and mai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.