Join us

सुख म्हणजे नक्की काय असतं: दादासाहेबांमुळे गौरीला परत मिळणार तिचे अधिकार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 6:00 PM

Sukh mhanje nakki kay asata:गौरीच्या आबांचा खून हा दादासाहेबांच्या हातून झाला असतो हे सत्य गौरी समोर येतं आणि ती घरातल्यांना सांगते.

छोट्या पडद्यावरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. घरात लाडकी सून असलेल्या गौरीला सध्या अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे. दादासाहेबांवर खूनाचा आरोप केल्यानंतर घरातील प्रत्येकाने तिला खडेबोल सुनावले. इतकंच काय तर गौरीला तिच्या सून असल्याच्या अधिकारांनाही गमवावं लागलं. परंतु, आता दादासाहेबांमुळेच तिला तिचे हिरावलेले अधिकार पुन्हा मिळणार आहेत.

स्टार प्रवाहने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये दादासाहेब घरी परत येतात. इतकंच नाही तर घरी परतल्यानंतर ते त्यांच्याकडून झालेला गुन्हा कबूल करतात आणि गौरीला सगळ्यांनी माफ करा व तिचे अधिकार तिला परत द्या असा आदेश देतात.

दरम्यान,  गौरीच्या आबांचा खून हा दादासाहेबांच्या हातून झाला असतो हे सत्य गौरी समोर येतं आणि ती घरातल्यांना सांगते. इतकी वर्षे आपण जे समजत होतो की माझ्या आबांचा खून गुंडांनी केला आहे. ते खोटे होते. माझ्या आबांचा खून दादांच्या हातातून झाला आहे, असं गौरी सांगते. तिच्या या वाक्यानंतर घरातील प्रत्येकाला धक्का बसतो. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारसेलिब्रिटी