Join us

आली लग्नघटिका समीप! 'शिवा' मालिका फेम अभिनेत्याच्या केळवणाला सुरुवात, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2024 4:08 PM

मराठी मनोरंजन विश्वात आता जोरदार लगीनघाई सुरु झाली असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठी मनोरंजन विश्वात आता जोरदार लगीनघाई सुरु झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. "येऊ तशी कशी मी नांदायला' मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरात पोहोचला. या मालिकेतील ओमकारच्या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. अभिनयाबरोबरच शाल्व त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. आता शाल्वच्या घरी लगीनघाई सुरू आहे. 

शाल्व किंजवडेकर  हा लवकरच श्रेया डफळापुरकर हिच्यासोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाआधीच्या म्हणजेच केळवणाला सुरुवात झाली आहे. नुकतेच शाल्व आणि श्रेया या दोघांचे पहिले केळवण पार पडले.  नुकतंच श्रेयाने सोशल मीडियावर केळवणाचे फोटो शेअर केले आहेत. . या फोटोमध्ये शाल्वने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. तर श्रेयाने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 

गेल्या वर्षी शाल्व आणि श्रेयाने साखरपुडा केला होता. मोठ्या थाटामाटात त्यांचा साखरपुडा पार पडला होता. शाल्व किंजवडेकरची होणारी पत्नी श्रेया ही व्यवसायाने फॅनन डिझायनर आहे. सोबत ती स्टायलिस्ट असून तिचं स्वतःच फॅशन लेबलसुद्धा आहे. अनेक कपड्यांच्या साड्यांच्या ब्रॅण्डसाठी श्रेयाने मॉडेलिंग केलं आहे. शाल्व व श्रेया सोशल मीडियावरुन एकमेकांबरोबरचे फोटो शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात. 

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी