छोट्या पडद्यावर काही दिवसांपूर्वी माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. कमी कालावधीतच या मालिकेला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. या मालिकेत अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेत श्रेयसने यश तर प्रार्थनाने नेहाची भूमिका साकारली आहे. या मालिकेतील यश आणि नेहाची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते आहे. श्रेयस तळपदेच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. श्रेयस तळपदेच्या पत्नीचे नाव दीप्ती तळपदे आहे. तीदेखील सेलिब्रेटीप्रमाणेच बऱ्याचदा चर्चेत येत असते. नुकतीच ती चर्चेत आली आहे.
श्रेयस तळपदेची पत्नी दीप्ती तळपदे सोशल मीडिया इंस्टाग्राम स्टोरीवर फोटो शेअर केला आहे. यात तिने एक जुना आणि एक आताचा फोटो शेअर केला आहे. यातील तिचा जुना फोटो साडीत आहे तर दुसरा फोटो वेस्टर्न आउटफिटमधील आहे.