स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी अर्थात शुभम आणि कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर (Samruddhi Kelkar) आणि हर्षद अतकरी (Harshad Atkari ) पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या गुढीपाडवा विशेष भागात ते दोघे एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात समृद्धीला सूत्रसंचालनात अभिनेता हर्षद अतकरी साथ देणार आहे.
यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहायला मिळत आहे. स्पर्धकांसोबतच सूत्रसंचालनही जोडीने सादर होते आहे. समृद्धीसोबतच स्टार प्रवाह परिवारातले कलाकार सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडतात. मन धागा धागा मालिकेतील सार्थक आणि साधी माणसं मालिकेतील सत्यानंतर आता अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडताना दिसेल.