Join us

श्वेता तिवारीचा कम बॅक शो ‘मेरे डॅड की दुल्हन’ लॉन्च होण्यापूर्वी अडकला वादात, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 11:07 AM

गेल्या काही दिवसांपासून  पर्सनल लाईफमुळे चर्चेत असलेली टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी लवकरच छोट्या पडद्यावर परतते आहे. ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत श्वेता मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पण श्वेताची ही मालिका ऑन एअर होण्यापूर्वीच वादात सापडली आहे.

ठळक मुद्दे‘मेरे डॅड की दुल्हन’ ही मालिका वडील व मुलीच्या नात्यावर आधारित आहे.

गेल्या काही दिवसांपासून  पर्सनल लाईफमुळे चर्चेत असलेली टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी लवकरच छोट्या पडद्यावर परतते आहे. ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेत श्वेता मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. पण श्वेताची ही मालिका ऑन एअर होण्यापूर्वीच वादात सापडली आहे. होय, अभिनेत्री व पंजाबी चित्रपट निर्माती प्रीती सप्रू यांनी ‘मेरे डॅड की दुल्हन’चे निर्माते टोनी व दीया सिंग यांना कोर्टात खेचले आहे. प्रीतीने ‘मेरे डॅड की दुल्हन’च्या निर्मात्यांवर कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. माझ्या ‘तेरी मेरी गल बन गई’ या आगामी पंजाबी चित्रपटाचा कॉन्सेप्ट चोरून निर्मात्यांनी ‘मेरे डॅड की दुल्हन’ मालिका बनवली, असाही तिचा आरोप आहे.

प्रीतीने सांगितले की, आम्ही ‘तेरी मेरी गल बन गई’ची स्क्रिप्ट 2017 मध्ये आयएमपीपीएमध्ये रजिस्टर्ड केली होती. यासंदर्भात आम्ही ‘मेरे डॅड की दुल्हन’ या मालिकेच्या मेकर्सशी संपर्क साधण्याचे प्रयत्न केले. पण त्यांच्याकडून कुठलेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आम्हाला कोर्टात धाव घ्यावी लागली. आमचा चित्रपट 90 टक्के पूर्ण झाला आहे आणि पुढील वर्षी रिलीज होतोय.दरम्यान ‘मेरे डॅड की दुल्हन’ची निर्माती दीया सिंग हिने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही 2017 मध्ये या मलिकेची कल्पना संबंधित चॅनलला ऐकवली होती. आमच्याकडे पुराव्यादाखल ईमेल आहेत. मालिकेचे कथानक रजिस्टर्स केले नसले तरी हे कथानक आम्ही चॅनलला फार पूर्वीच ऐकवले होते, असे दीयाने सांगितले.

‘मेरे डॅड की दुल्हन’ ही मालिका वडील व मुलीच्या नात्यावर आधारित आहे. यात श्वेता महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसणार आहे.  गेल्या काही दिवसांपासून श्वेता तिच्या पर्सनल लाईफला घेऊन सतत चर्चेत आहे. श्वेताचा पती अभिनव कोहली तिने  घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. यानंतर अभिनवला अटक करण्यात आली होती.   

टॅग्स :श्वेता तिवारी