Join us

अभिनेत्री श्वेता तिवारीचं वादग्रस्त विधान, म्हणाली - 'माझ्या ब्रा ची साइज...'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:12 PM

Shweta Tiwari Controvercial Statement : श्वेताने आता एक असं वादग्रस्त वक्तव्य (Shweta Tiwari Controvercial Statement) केलं आहे ज्यामुळे ती अडचणीत येऊ शकते.

लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) अलिकडे तिच्या दिवसेंदिवस खुलत चाललेल्या सौंदर्यामुळे आणि आणि तिच्या दमदार कामांमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर बोल्ड, ग्लॅमरस फोटो टाकून ती फॅन्सचं मन जिंकत असते. पण श्वेताने आता एक असं वादग्रस्त वक्तव्य (Shweta Tiwari Controvercial Statement) केलं आहे ज्यामुळे ती अडचणीत येऊ शकते. तिने तिच्या ब्रा च्या साइज आणि देवाबाबत मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाली श्वेता तिवारी?

बुधवारी श्वेता तिवारी तिच्या आगामी वेब सीरिजच्या घोषणेसाठी भोपाळमध्ये गेली होती. जिथे ती वेब सीरिजच्या संपूर्ण टीमसोबत प्रेम कॉन्फरन्समध्ये सहभागी झाली होती. इथे मीडियासोबत बोलताना श्वेता तिवारीचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलं. श्वेता तिवारी यावेळी प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हणाली की, 'माझ्या ब्रा चं माप देव घेत आहे'.

लोक चिडले....

फॅशनशी संबंधित वेब सीरिज 'शो स्पॉपर' च्या घोषणेवेळी श्वेता तिवारी आणि रोहित रॉयसोबत इतरही कलाकार भोपाळमध्ये आले होते. श्वेता तिवारी भोपाळमध्ये मीडियासमोर लोकांच्या भावना दुखावणारं हे वक्तव्य करून वाद अंगावर ओढवून घेतला आहे. यावेळी मंचावर एका डिस्कशनमध्ये गंमतीने श्वेताने तिवारीने हे वादग्रस्त वक्तव्य केलं. या वक्तव्या श्वेताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान मध्य प्रदेशचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी श्वेता तिवारीच्या वक्तव्याची माहिती घेतली. ते मीडियासोबत बोलताना म्हणाले की, 'श्वेता तिवारीचं वक्तव्य मी ऐकलंय. या वक्तव्याची मी निंदा करतो. मी भोपाळ पोलिसांना आदेश दिले आहेत की, याची चौकशी करून मला रिपोर्ट द्यावा. त्यानंतर कारवाई केली जाईल'.

आधीही सापडली होती वादात

ही पहिलीच वेळ नाही की, श्वेता तिवारी वादग्रस्त वक्तव्य करून वादात सापडली. याआधीही ती कौटुंबिक वादामुळे मीडियात चर्चेत होती. आधी ती पहिला पती राजा चौधरी आणि नंतर दुसरा पी अभिनव कोहलीसोबत वादानंतर ती मीडियात बरेच दिवस चर्चेत होती. 

टॅग्स :श्वेता तिवारीटेलिव्हिजनमध्य प्रदेश