अभिनेत्री श्वेता तिवारीनं (Shweta Tiwari ) एक नाही तर दोन लग्नं केलीत. मात्र दोन्ही लग्नं फार काळ टिकली नाहीत. दोन वर्षांपूर्वी श्वेता दुसरा पती अभिनव कोहलीपासूनही वेगळी झाली आहे. तेव्हापासून श्वेता सतत चर्चेत असते. आता मात्र श्वेता एका वेगळ्याच कारणानं चर्चेत आली आहे. केवळ चर्चेत नाही तर नेटक-यांनी तिला ट्रोल केलं आहे.श्वेताने मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, त्याच्यासोबतचा फोटो शेअर केला आणि हा फोटो पाहून काही ट्रोलर्सनी तिला लक्ष्य केलं. श्वेताच्या या मित्राचं नाव विकास कलंत्री आहे. श्वेताने विकाससोबतचे जुने फोटो शेअर करत त्याच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली.
‘तुझ्यासाठी काय लिहू? जेव्हा मला बोलावसं वाटतं तू ऐकतोस...जेव्हा मला वाट चुकल्यासारखं वाटतं तू मार्गदर्शन करतोस...जेव्हा मी संभ्रमात असते तू माझा आत्मविश्वास वाढवतोस...जेव्हा मला पुन्हा एखाद्यावर विश्वास ठेवायला शिकायचं होतं तेव्हा तू सिद्ध केलंस की मी ते करू शकते आणि म्हणूनच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. माझ्या गोड मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा....,’असा खास मॅसेज श्वेतानं त्याच्यासाठी लिहिली आणि यानंतर अनेकांनी श्वेताला ट्रोल करायला सुरूवात केली.‘आता हा तिसरा का?’, आता नवा बकरा पकडलास का? अशा काय काय कमेंट्स ट्रोलर्सनी या फोटोवर केला. याचं पण आयुष्य खराब करशील तू, असं एका ट्रोलरने लिहिलं.
श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने राजा चौधरीसोबत लग्न केले. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला. पण हे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही. 2019 मध्ये श्वेता पती अभिनव कोहलीलापासून वेगळी झाली. दुसरा संसार मोडल्यावर श्वेताला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. श्वेता आणि अभिनवला रेयांश नावाचा मुलगा आहे.