Join us  

'दोनदा विश्वासघात झाल्यावर...' घटस्फोटांवर श्वेता तिवारीने व्यक्त केलं दु:ख; लेकीसाठी घेतला निर्णय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 9:30 AM

श्वेताने प्रोफेशनल आयुष्यात खूप यश मिळवलं पण तिचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं.

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) 'संतूर मॉम' म्हणून लोकप्रिय आहे. ४३ वर्षीय  श्वेताला २३ वर्षांती एक मुलगी आणि ८ वर्षांचा मुलगा आहे. तरी तिचा फिटनेस कमालीचा आहे. श्वेताने प्रोफेशनल आयुष्यात खूप यश मिळवलं पण तिचं वैयक्तिक आयुष्य कायम चर्चेत राहिलं. दोन घटस्फोटांमुळे तिला टोमणे ऐकावे लागले. नुकतंच तिने एका मुलाखतीत या सर्व गोष्टींवर खुलेपणाने चर्चा केली. 

'गलाटा इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत श्वेता तिवारी म्हणाली, "जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा धोका मिळतो तेव्हा खूप वेदना होतात. तुम्ही रडता, तुम्हाला वाटतं देव माझ्यासोबतच का असं करत असेल? तुम्ही हे निस्तरायचा पुरेपूर प्रयत्न करता. जेव्हा दुसऱ्यांदाही हेच घडतं तेव्हा वाटतं की हे कधीच थांबणार नाही. हे असंच चालत राहणार. जेव्हा तिसऱ्या वेळीही धोका मिळतो तेव्हा तुम्हाला काहीच फरत पडत नाही. आता जेव्हा कोणी माझा विश्वासघात करतो तेव्हा मी याची तक्रार करत नाही. मी फक्त स्वत:ला वेगळं करते. मला दु:ख देणं हे त्यांच्या व्यक्तिमत्वात आहे आणि मी याचा फरक न पडू देणं हे माझ्या व्यक्तिमत्वात आहे."

अशा नात्यातून बाहेर पडण्यासाठी वेळ का लागला? यावर ती म्हणाली, "माझ्या कुटुंबात कोणीच लव्हमॅरेज केलं नव्हतं पण मी केलं. आमच्या कुटुंबात जातीलाही महत्व होतं पण तरी मी इंटरकास्ट मॅरेज केलं. लोकांनी माझ्या आईला खूप टोमणे मारले आणि माझ्या लग्नाला जज करणं सुरु केलं. ९ वर्षांनंतर मी त्या नात्यातून बाहेर पडले."

मी तेव्हा आर्थिकरित्या सक्षम होते पण भावनिकरित्या नाही. माझ्या मुलीकडे पाहून मला वाटायचं की मोठं झाल्यावर हिला वडील नसतील. नंतर मला जाणीव झाली की तुम्ही जर मानसिकरित्या आनंदी असाल तर तुमचं कुटुंबही आनंदी असतं. लेकीसाठी मी त्याला सोडलं तिचं संगोपन चांगलं होणं गरजेचं होतं. जर दोन जण सोबत राहूच शकत नाही तर त्यांनी वेगळं होणं कधीही चांगलं."

टॅग्स :श्वेता तिवारीटिव्ही कलाकारघटस्फोटपलक तिवारी