दहा वर्षांपूर्वी 'कसौटी जिंदगी की' मालिकेत प्रेरणाच्या भूमिकेतून अभिनेत्री श्वेता तिवारी घराघरात पोहचली आणि आजही ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. आता या मालिकेचा दुसरा भाग सप्टेंबरच्या अखेरपर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेच्या निर्मात्यांना अनुराग व प्रेरणाच्या भूमिकेसाठी कलाकारांची निवड करणे सोप्पी बाब नव्हती. कित्येक अभिनेत्रींची लूक टेस्ट केल्यानंतर एरिका फर्नांडिसची प्रेरणाच्या भूमिकेसाठी वर्णी लागली. मात्र जेव्हा प्रेरणाच्या भूमिकेबाबत विचार करताना सर्वात पहिल्यांदा बालाजी टेलिफिल्म्सच्या डोक्यात नाव आले ते म्हणजे दुसरे तिसरे कुणी नाही तर श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीचे. मात्र तिने काम करण्यास नकार दिला.
मीडिया रिपोर्टनुसार श्वेताने सांगितले की, प्रेरणाच्या भूमिकेसाठी तिच्या सतरा वर्षांची मुलगी पलकला विचारण्यात आले होते. तिला देखील या संधीचा फायदा घ्यायचा होता. तसेच फक्त श्वेताच नाही तर बालाजी प्रोडक्शनची टीम व तिच्या जवळच्या व्यक्तींना वाटत होते की पलकने प्रेरणाची भूमिका करावी. पण पलकनेच ही ऑफर नाकारली. तिने श्वेताला सांगितले की, मी मालिकेत काम करेन असे वाटत नाही. या वयात मी रात्रंदिवस काम नाही करू शकत.पलकने फक्त 'कसौटी जिंदगी की २' ह्या मालिकेलाच नाही तर आणखीन काही मालिकेत काम करण्यास नकार दिला. सध्या तिला अभ्यासावरच लक्ष केंद्रीत करायचे आहे. श्वेताने पलकला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.पलकचे कौतूक करताना श्वेता म्हणाली की, मी खूप नशीबवान आहे की मला पलकसारखी संवेदनशील मुलगी आहे. ती खूप जबाबदार मुलगी आहे. तिला कोणत्याही वाईट सवयी नाहीत. ती मित्रमंडळींसोबत बाहेर गेली तर ती रात्री साडे आठ पर्यंत घरी येते आणि कोणाच्या बर्थडे पार्टीला गेली तर ती साडे अकरा वाजेपर्यंत घरी येते.