मी सोसले, तू कधीच सहन करू नकोस...! श्वेता तिवारीने शेअर केला इमोशनल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:14 PM2021-03-09T17:14:43+5:302021-03-09T17:15:34+5:30

श्वेता तिवारी टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याच श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले.

shweta tiwari shares domestic violence experieces ask daughter palak to fight against it |   मी सोसले, तू कधीच सहन करू नकोस...! श्वेता तिवारीने शेअर केला इमोशनल व्हिडीओ

  मी सोसले, तू कधीच सहन करू नकोस...! श्वेता तिवारीने शेअर केला इमोशनल व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देश्वेता तिवारीने आधी भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केले होते. त्याच्यापासून तिला एक मुलगी आहे.

टीव्हीवर स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण करणारी श्वेता तिवारी हिला कोण ओळखत नाही़. आज ती टीव्हीवरची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. याच श्वेताने ख-या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. वयाच्या केवळ 18 व्या वर्षी तिने राजा चौधरीसोबत लग्न केले. पण राजाच्या छळाला कंटाळून तिने त्याला घटस्फोट दिला. यानंतर अभिनव कोहलीसोबत तिने दुसरा संसार थाटला. पण हे दुसरे लग्नही फार काळ टिकू शकले नाही.  नुकतीच श्वेता पती अभिनव कोहलीलापासून वेगळी झाली. दुसरा संसार मोडल्यावर श्वेताला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. महिला दिनी श्वेताने एक इमोशनल व्हिडीओ शेअर करत, कौटुंबिक हिंसाचाराच्या वेदना व्यक्त केल्या आहेत.

ती व्हिडीओत म्हणते, ‘अनेक महिलांना कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो. पण त्या याविरोधात बोलत नाही. तुम्ही चूप राहाल तर तुमची मुलंही चूप राहणेच शिकतील. याऊलट या विरोधात एक पाऊल टाकल्यास, मुलांना चूक आणि बरोबर यातील फरक कळेल. मी नव-याविरोधात बोलले म्हणून आजही लोक माझ्यावर टीका करतात. पण मी जे काही केले ते माझ्या मुलीसाठी केले. तिला अधिक खंबीर बनवण्यासाठी केले. मी फक्त माझ्या मुलीला सांगू इच्छिते की, स्वत:साठी लढशील तर लोक तुझ्यावर विश्वास ठेवतील.’

लेकीला दिला सल्ला...
प्रिय पलक, मी कदाचित नेहमीच तुझ्या पाठीशी ढाल बनून राहू शकणार नाही. पण मला विश्वास आहे की, माझ्या अनुभवातून आणि योग्य निर्णयातून तू धडा घेशील. स्वत:साठी लढायला शिकशील. तुझ्या नशीबी कधीच असे भोग येऊ नयेत. पण नेहमी स्वत:साठी लढायला शिक़ खंबीर बन. आयुष्याच्या लढाईत तुला खूप सारे धैर्य, हिंमत मिळो, ही कामना करते, असे श्वेताने म्हटलेय.

श्वेता तिवारीने आधी भोजपुरी अभिनेता राजा चौधरीशी लग्न केले होते. त्याच्यापासून तिला एक मुलगी आहे. पण मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात दुरावा आला आणि ते दोघे वेगळे झाले. त्यानंतर ती अभिनव कोहलीच्या प्रेमात पडली. दोघांनी 3 वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर विवाह केला होता.  

Web Title: shweta tiwari shares domestic violence experieces ask daughter palak to fight against it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.