Join us

वेब शोमध्ये इंटिमेट सीन्स देणारी श्वेता तिवारी ट्रोल, लोकांच्या दुटप्पीपणावर दिलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 5:53 PM

श्वेता तिवारी नेमकं काय म्हणाली?

अभिनेत्री श्वेता तिवारीच्या (Shweta Tiwari) फिटनेसची आणि सौंदर्याची नेहमीच चर्चा असते. वयाच्या 43 व्या वर्षीही तिच्या हॉटनेसने नेटकऱ्यांना वेड लावलंय. श्वेताला 23 वर्षांची पलक ही लेकही आहे. पलकसमोरही श्वेताच जास्त सुंदर दिसते असं अनेक नेटकरी म्हणतात. नुकतंच श्वेताच्या जुन्या एका सीरिजमधील इंटिमेट सीनवरुन आता तिला पुन्हा ट्रोल केलं जातंय. यावर श्वेताने ट्रोलर्सला उत्तर दिलं आहे. 

श्वेता तिवारीची 'हम तुम और देम' ही सीरिज 2019 साली प्रदर्शित झाली होती. यामध्ये तिने अभिनेता अक्षय  ओबेरॉयसोबत इंटिमेट सीन्स दिले होते. अक्षयने तिच्या नवऱ्याची भूमिका साकारली होती. या सीन्समुळे श्वेताला जबरदस्त ट्रोल करण्यात आलं होतं. श्वेता दोन मुलांची असून असे सीन्स देते हे लोकांना पचलंच नव्हतं. आता एका मुलाखतीत श्वेता त्यावेळच्या ट्रोलिंगवर उत्तर दिलं. ती म्हणाली, "जे लोक म्हणतात की हे काय अश्लील दाखवत आहात. किती बोल्ड दाखवत आहात. हेच लोक नेटफ्लिक्सवर जाऊन अशाच प्रकारचे हॉलिवूड शो बघतात. फॉरेन देश जे बनवतात ते सगळे इंग्लिश बोल्ड कंटेंट हे लोक पाहतात. "

ती पुढे म्हणाली,"इतकंच काय वेगळ्या भाषेतले शोजही लोक पाहतात आणि म्हणतात की काय शो बनवलाय यार. तो शो नक्की पाहा. आज मी जर तेच केलंय तर त्यांना चुकीचं का वाटतंय? हेच तुम्ही भारतात बनवलं तर एवढं अश्लील का वाटतं? आपल्या समाजात किती दुटप्पी लोक आहेत. असा दुटप्पीपणा दाखवताना लाज नाही वाटत का?"

टॅग्स :श्वेता तिवारीटिव्ही कलाकारट्रोलसोशल मीडिया