'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' (Tujhya Majhya Sansarala Ani Kaay Hawa ) या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली आहेत आणि आता ही मालिका एका रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. अनेक अडचणींचा सामना करत अखेर सीड आणि अदितीच्या या दोघांचे लग्न पार पडले. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे.
विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. लग्न हे नेहमी दोन माणसांच नाही तर दोन कुटुंबांचं असतं असं नेहमी म्हंटल जातं आणि देशमुख कुटुंब जे आपल्या नात्यांना आणि परंपरांना जपून आहेत, त्यांच्या गुळपोळीला गावात झालेलं लग्न म्हणजे एका सोहळ्यापेक्षा कमी नव्हता.
सीड आणि अदितीच्या लग्नात सर्व पारंपरिक विधी संपन्न झाल्याचे रसिकांना पाहायला मिळाले. रसिकांनाही मोठ्या कुटुंबाचं अस्सल गावाकडचं मराठी लग्नं पाहायला मिळालं.ही प्रेक्षकांसाठी एक पर्वणीच होती. या पारंपरिक पार पडलेल्या सोहळ्यात मुहूर्त मेढ, चुडा भरणे, सवाष्ण भोजन, मेहेंदी या सगळ्या विधी दाखवण्यात आल्या. गावाकडे लग्न हे अगदी साग्रसंगीत आणि थाटामाटात होतं आणि हा सगळा थाट प्रेक्षकांना या मालिकेच्या निमित्ताने घरबसल्या अनुभवता आला.
आता पुन्हा एकदा मालिकेत उत्साहाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. देशमुख कुटुंब कुठलाही सण हा पारंपरिक पद्धतीने संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करतो. सिड आणि अदितीची ही लग्नानंतरची पहिलीच मकरसंक्रांत देशमुखांच्या घरात अगदी उत्साहात साजरी होणार आहे.अदिती हलव्याचे दानिगे घालून नटणार असून तिच्या सोबत देशमुख घरातील सगळे कुटुंबीय अगदी पारंपरिक पद्धतीने हा सण साजरा करताना दिसतील.मकर संक्राती स्पेशल हा भागही रसिकांसाठी रंजक असणार आहे.