टीव्ही इंडस्ट्रीतून पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर येत आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेते सिद्धांत वीर सुर्यवंशी(Siddhaanth Vir Surryavanshi ) यांचं निधन झालं आहे. 46 वर्षीय अभिनेत्याचा जिममध्ये वर्कआउट करताना मृत्यू झाला. मृत्यूबाबत अजून कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र, त्याच्या चाहत्यांनी त्याच्या इंस्टाग्राम पोस्टवर 'RIP' कमेंट करायला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी सकाळी सिद्धांत जिममध्ये वर्कआउट करत असताना त्यांचे निधन झाल्याचे बोलले जात आहे. सिद्धांतला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. डॉक्टरांनी सिद्धांत वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, परंतु ते अयशस्वी झाले. राजू श्रीवास्तव आणि दीपेश भान यांच्यानंतर जिममध्ये वर्कआउट करताना अभिनेत्याचा झालेला हा तिसरा मृत्यू आहे.
'कुसुम', 'वारीस' आणि 'सूर्यपुत्र करण' या मालिकांसाठी हा अभिनेता खूप प्रसिद्ध आहे. टीव्ही अभिनेता जय भानुशालीने चाहत्यांना ही दु:खद बातमी दिली आहे. सिद्धांत वीर यांच्या पश्चात पत्नी एलिशिया राऊत आणि दोन मुले आहेत. फिटनेसबाबत सिद्धांत खूप सजग होता.
कोण होते सिद्धांत वीर सूर्यवंशी?सिद्धांत वीर सूर्यवंशी यांनी आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. त्यांना आनंद सूर्यवंशी या नावानेही ओळखले जात होते. 'कुसुम' या मालिकेतून त्याने टीव्हीमध्ये पदार्पण केले. याशिवाय सिद्धांत वीर सूर्यवंशी यांनी अनेक लोकप्रिय टीव्ही शोमध्ये काम केले. 'कसौटी जिंदगी की', 'कृष्ण अर्जुन', 'क्या दिल में है' मालिकांमुळे सिद्धांत वीर सूर्यवंशी हे नाव घराघरात पोहोचले. 'क्यों रिश्तों में कट्टी बत्ती' आणि 'जिद्दी दिल' हे त्यांचे शेवटचे प्रोजेक्ट होते.