Join us

सिद्धार्थ बोडकेची बायकोच्या वाढदिवशी खास पोस्ट, तितीक्षासोबतच्या रोमँटिक फोटोंनी वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 18:05 IST

लग्नानंतर तितीक्षाचा हा पहिलाच वाढदिवस त्यामुळे सिद्धार्थनेही तो खास बनवला आहे.

मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडे (Titeeksha Tawde)  लोकप्रिय मालिका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मध्ये मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेमुळे तितीक्षाच्या चाहतावर्गात मोठी वाढ झाली. सगळीकडेच तिला आता नेत्रा याच नावाने ओळखलं जात आहे. तितिक्षाचा आज वाढदिवस साजरा करत आहे. तिचा नवरा आणि अभिनेता सिद्धार्थ बोडकेने (Siddharth Bodke) सुंदर फोटो शेअर करत तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

हातात ड्रिंकचा ग्लास, ग्लॅमरस डीप नेक वनपीस अशा लूकमध्ये तितीक्षा नवरा सिद्धार्थच्या मिठीत आहे. त्यांचा हा कोझी फोटो चाहत्यांना भलताच पसंतीस पडलाय. याच वर्षी दोघंही लग्नबंधनात अडकले. लग्नानंतर तितीक्षाचा हा पहिलाच वाढदिवस त्यामुळे सिद्धार्थनेही तो खास बनवला आहे. सिद्धार्थने फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिले, "माझ्या आयुष्यातलं माझं प्रेम, माझ्या सुंदर बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आयुष्याची जोडीदार म्हणून आज तुझा पहिलाच वाढदिवस साजरा करत आहोत. तुझ्यासोबतचा प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी गिफ्टच आहे आणि आज मी तुला सेलिब्रेट करतोय."

तो पुढे लिहितो, "तू अप्रतिम आहेस आणि जगात जे काही चांगलं आहे त्यासाठी तू पात्र आहेस. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवो. तुझं स्वप्न आता आपलं स्वप्न आहे. त्याचं वास्तवात रुपांतर करु. तू माझी सगळ्यात जवळची मैत्रिण, माझा विश्वास आणि मला मिळालेला आशीर्वाद आहेस. एकमेकांसोबत अगणित आठवणी बनवूया आणि एकमेकांवर नितांत प्रेम करुया. कायम. तू माझं सर्वस्व आहेस."

सिद्धार्थच्या या गोड पोस्टवर तितिक्षानेही कमेंट करत लिहिले, "तुझ्यासारखा बोलका आणि प्रेमळ नवरा मिळाला म्हणून मी कायम आभारी आहे. I Love You. हा खरंच हॅपी बर्थडे झाला."

इतर कलाकारांनीही तितीक्षाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. २६ फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ आणि तितीक्षा लग्नबंधनात अडकले. अगदी थाटात त्यांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नाआधी बरीच वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. 

टॅग्स :तितिक्षा तावडेमराठी अभिनेताटेलिव्हिजनसोशल मीडिया