सोनी सबने वंशज (Vanshaj) या आपल्या आगामी मालिकेचा प्रोमो अलीकडेच रिलीज केला आहे, ज्यामध्ये एक तरुण मुलगी आपल्या कौटुंबिक व्यवसायात सर्वोच्च पदासाठी आपला दावा मांडताना दिसते. या प्रोमोवरुन एका रोचक चर्चेला तोंड फुटले आहे. कौटुंबिक व्यवसाय प्रामुख्याने घरातील पुरुष वारसदारांकडे सोपविण्याची पद्धत आपल्या समाजात रूढ आहे. परंतु, सध्याच्या काळात कौटुंबिक वारशाच्या बाबतीत देखील लैंगिक समानतेशी संबंधित प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे. या संदर्भात एका आकडेवारीवर नजर टाकली, तर 2019 मध्ये PWC ने केलेल्या एका सर्वेक्षणात भारतातील अशा कौटुंबिक व्यवसायांत, जेथे पुढची पिढी व्यवसाय चालवते, 58% प्रकरणांत महिलांचा समावेश नसतो. पण अशी परिस्थिती का आहे की, भारतात अजूनही कौटुंबिक व्यवसायाचे उत्तराधिकारी निवडताना क्षमतेपेक्षा तो वारस स्त्री आहे की पुरुष याला जास्त महत्त्व दिले जाते.
जनमानसचे मत तयार करण्यात टेलिव्हिजनची प्रभावी भूमिका असते, हे मान्य करून सोनी सबने एक ब्रॅंड म्हणून घेतलेला पुरोगामी पवित्रा बघणे आणि प्रगती करण्यास वाव असणाऱ्या क्षेत्रात महिलांची भूमिका या विषयावरील कथा सादर करून त्याविषयी चर्चा सुरू करणे रोचक असेल. वंशजच्या विचार करायला लावणाऱ्या प्रोमोमधून मालिकेत काय असणार आहे, याची झलक प्रेक्षकांना बघायला मिळाली आहे. मालिकेचा प्रवास बघणे आणि त्यातून आशेचे बीज रुजताना बघणे रोचक असेल.
अभिनेत्री अंजली तत्रारीची आगामी मालिका वंशजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने मालिकेत युविकाची भूमिका साकारली आहे. वंशज ही मालिका १२ जूनपासून दर सोमवार ते शनिवार रात्री 10 वाजता पाहायला मिळणार आहे. अंजलीने 2018 मध्ये सिम्बा या अॅक्शन चित्रपटाद्वारे तिच्या अभिनयाची सुरुवात केली, ज्यामध्ये तिने एक छोटी भूमिका केली होती. नंतर तिने मेरे डॅड की दुल्हन, तेरे बिना जिया जाय ना यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केले.