सूरज चव्हाणने काल बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनचं विजेतेपद पटकावलं. सूरज विजयी होताच अभिनेता-गायक-गीतकार उत्कर्ष शिंदेने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे. उत्कर्ष लिहितो, "कासवाची आणि सश्याची शर्यत आठवली आज..”बनला आण बाण बिगबॉसची शान आपला सूरज चव्हाण”..आयुष्य जगून समजते. वाचून अथवा ऐकून नाही. बरेच जण म्हणाले सूरजने काय वेगळं केल घरात? फक्त झापूक झुपूक तर केलं. आणि जिंकला त्यांना मला हेच सांगायचं आहे. घरात आपुलकी , मानसन्मान , कोणाचा निरादर नाही, कोणाची कधीकसलीच भीती नाही तर कोणा समोर माज गर्व नाही. की कोणा साठी मनात क्लेष नाही. जे होत स्वछ निर्मळ सरळ खोटं नाट नाहीच."
उत्कर्ष पुढे लिहितो, "एकाग्र सैयमी कासव उड्या मारणाऱ्या सश्यांना जसा हरवतो तसाच शांत एकाग्रतेने आपल्या खेळाशी एकनिष्ठ राहून ना लफडे ना झगडे फक्त १००% मेहनतीने आपला कासव सर्वांची मनेही जिंकण्यात आणि ट्रॉफी ही जिंकण्यात यशस्वी झाला.आज मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी ह्यांच्या कार्यक्रमात माझा परफॉर्मन्स असल्या कारणाने मध्ये मध्ये मोबाईल वरच जिओ सिनेमावर बिगबॉस बघण माझं सुरुच होत.आणि जसाच सूरज जिंकला हे कळाल इतका आनंद झाला की कार्यक्रम संपवून घरी येऊन सरळ स्टुडिओत आलो आणि लगेच हे गाण लिहलं रचला बनवल संगीतबद्ध केलं. गायलं आणि लगेच आल्हाद बरोबर व्हिडीओ शूट केलं .१ तासात गाण तयार.."
उत्कर्ष शेवटी लिहितो, "सूरज जिंकल्याचं आनंद गाऊन नाचून साजरा केला. केदार शिंदेसर आपण दिलेल्या झापूक झुपूक चित्रपटाची ऑफर ऐकून खूप छान वाटलं.love you for this sir .लवकरच महागायक आनंद शिंदे ह्यांच्या आवाजात मी सूरजच गाण घेऊन येतोच आहे. सूरज चव्हाण मित्रा तू लवकर फ्री हो खूप नाचायचंय आणि नाचवायचंय आख्या महाराष्ट्राला.बाकी सूरज जिंकला म्हणून ज्यांना कुठे जळत असेल त्यांनी बर्नोल क्रीम ओईंटमेंट लावावे वाटल्यास त्याचे पैसे मी देईन."