Join us

"आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा..." रतन टाटांच्या निधनानंतर उत्कर्ष शिंदेची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:21 AM

आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Ratan Tata Demise: उद्योगविश्वाला नवा आयाम देणारे, 'टाटा' या नाममुद्रेच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे उद्योगपती, दानवीर रतन टाटा यांचा जीवनप्रवास वयाच्या ८६व्या वर्षी थांबला. सर्वसामान्य कुटुंबीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करून नॅनोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले टाटा यांच्या नाण्याने उद्योगविश्वातील एक ऋषितुल्य व्यक्तीची न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या शालीन आणि सुसंस्कृत स्वभावासाठी ओळखल्या जाणाऱ्या रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वासह सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अशातच सोशल मीडियावर लोकप्रिय गायक उत्कर्ष शिंदेने भावुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

उत्कर्ष शिंदेने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रतन टाटा यांच्याविषयी अश्रू ढालणारी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लिहलंय, "खूप वाईट वाटतंय, आम्ही ही सांगू की आम्ही त्या युगात जन्म घेतलाय जेव्हा आमच्या अवती भोवती हे देव पुरुष हयातीत होते. माणसातला देव देवाला भेटणार!" असं म्हणत उत्कर्षने भावुक करणारी पोस्ट लिहल्याचं पाहायला मिळतंय. यासोबत रतन टाटा यांचा फोटो त्याने शेअर केलाय.

टाटा यांना सोमवारी पहाटे प्रकृती अस्वास्थ्यामुळे बीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यातर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटीलेटवर ठेवण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या चमूकडून सर्व शर्तीचे प्रयत्न सुरु होते मात्र रात्री उशिरा त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. रात्री उशिरा टाटा सन्स चे चेअरमन एन्, चंद्रशेखरन यांनी ही बातमी अधिकृतरित्या जाहीर केली.

टॅग्स :रतन टाटाटिव्ही कलाकारसोशल मीडिया