Join us

OMG! 'टीव्ही इंडस्ट्रीतल्या या ६ अ‍ॅक्ट्रेसनं प्रसिद्धीसाठी निवडला बोल्डनेसचा ऑप्शन, पहा कोण आहेत त्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2019 20:00 IST

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील या सहा अभिनेत्रींनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेबसीरिजमध्ये बोल्ड सीन दिले आहेत.

टेलिव्हिजन जगतही खूप लोकप्रिय आहे आणि टेलिव्हिजनवरील कलाकार देखील बॉलिवूड स्टार्सपेक्षा कमी नाही. टेलिव्हिजन इंडस्ट्री भलेही छोटी मानली जाते. मात्र या इंडस्ट्रीत काम करणारे कलाकार प्रसिद्ध होण्यासाठी वेबसीरिजसारख्या डिजिटल माध्यमांचा पर्याय अवलंबतात. यात टिव्ही इंडस्ट्रीतील सहा अभिनेत्रींचा समावेश आहे, ज्यांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी वेबसीरिजमध्ये एकापेक्षा एक बोल्ड सीन दिले आहे. 

सुरवीन चावला

हेट स्टोरी २ चित्रपटात आपल्या बोल्ड अदातून रसिकांना घायाळ करणारी अभिनेत्री सुरवीन चावलाने अभिनयाच्या कारकीर्दीची सुरूवात टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून केली आहे. तिने कहीं तो होगा मालिकेत चारूची भूमिका साकारली होती. इतकंच नाही तर तिने काही पंजाबी चित्रपटातही काम केलेलं आहे.

अनीता हसनंदानी

स्टार प्लस वाहिनीवरील लोकप्रिय मालिका ये है मोहब्बतेंमध्ये काम करणारी अभिनेत्री अनीता हसनंदानी टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अनीताने बॉलिवूडमधील काही चित्रपटांमध्ये कामदेखील केलं आहे. सध्या ती लोकप्रिय रिएलिटी शो नच बलिएच्या सीझन ९मध्ये दिसते आहे.

मौनी रॉय

मौनी रॉयने बॉलिवूड चित्रपट रेस ३मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. लोकप्रिय मालिका नागिनमधून मौनी घराघरात पोहचली. कित्येक वेळा मौनी बिकनी लूकमध्ये चाहत्यांचं लक्ष वेधून घेते. तसेच ती झलक दिखला जाच्या सीझन ९मध्ये दिसली होती. तसेच मौनी अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटातही मुख्य भूमिकेत झळकली होती.

रूबी डायलिक

रुबी डायलिक २००८ साली प्रसारीत झालेल्या छोटी बहू मालिकेतून लोकप्रिय झाली होती. मात्र रूबी खऱ्या आयुष्यात खूप हॉट व बोल्ड आहे. बऱ्याचदा ती तिचे हॉट व बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतंच रूबी बॉयफ्रेंडसोबत लग्नबेडीत अडकली आहे.

शमा सिकंदर

टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील शमा सिकंदर हे प्रचलित नाव आहे. मात्र शमा काही वर्षांपासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून अचानक गायब झाली होती. नुकतंच ती चित्रपट सेक्सोहोलिकमध्ये दिसली होती.तसेच तिने मीटू मोहिमेवर देखील आपली प्रतिक्रिया दिली होती. शमा सोशल मीडियावर नेहमी बोल्ड फोटो शेअर करत असते.

गौहर खान

गौहर खान बिग बॉसची विजेती आहे. गौहर खानदेखील छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो बिग बॉस ७ची ट्रॉफी जिंकून तिनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तसंच ती डान्स रिएलिटी शो झलक दिखला जाच्या तिसऱ्या सीझनची फर्स्ट रनर अप होती. गौहरच्या अदांवर आजही लोक फिदा आहेत. शेवटची गौहर बेगम जान चित्रपटात दिसली होती.

टॅग्स :टिव्ही कलाकारगौहर खानशमा सिंकदरमौनी राॅयसुरवीन चावला