'गुलाम' फेम रिध्दीमा तिवारीने विद्या बालनकडून घेतलीय प्रेरणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2017 6:31 AM
प्रत्येक व्यक्तिसाठी कोणी ना कोणी आदर्श असतो. त्या व्यक्तिला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जण आपले यश गाठत असतो. टीव्ही अभिनेत्री ...
प्रत्येक व्यक्तिसाठी कोणी ना कोणी आदर्श असतो. त्या व्यक्तिला डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक जण आपले यश गाठत असतो. टीव्ही अभिनेत्री रिध्दीमा तिवारीलाही आपल्या करिअरमध्ये उत्कृष्ट कलाकार बनण्याची प्रेरणा अभिनेत्री विद्या बालनकडून मिळाली आहे.‘लाईफ ओके’वरील ‘गुलाम’ मालिकेत माल्दावाली ही व्यक्तिरेखा साकारणारी रिध्दिमा तिवारी या भूमिकेला प्रेक्षकांकडून मिळालेल्या प्रतिसादावर खुश आहे.रिध्दिमा तिवारीने नामवंत अभिनेत्री विद्या बालन हिच्याबरोबर ‘बेगम जान’ या चित्रपटात भूमिका साकारली असून विद्याकडून तिने प्रेरणा घेतली आहे. ‘डर्टी पिक्चर’मधील ‘उ ला ला…’ गाण्यात विद्याने परिधान केलेल्या धाडसी पोशाखाबद्दल रिध्दिमा तिचे कौतुक करते. गुलाम मालिकेतील आपली भूमिका आणि ज्या त-हेने माल्दावाली ही व्यक्तिरेखा सादर करण्यात आली आहे, ती गोष्ट ती खूपच शक्तिशाली आहे, असे रिध्दिमाचे मत आहे. या भूमिकेबद्दल रिध्दिमा तिवारीने सांगितले, “‘द डर्टी पिक्चर’ या चित्रपटात विद्या बालनने साकारलेली भूमिका ही तिने आजवर केलेल्या सर्वात उत्कृष्ट भूमिकांपैकी एक आहे. या चित्रपटातली तिची भूमिका खूपच धाडसी होती, जशी ‘गुलाम’मधली माझी भूमिका आहे. त्या चित्रपटातील तिची देहबोली शिकण्यासाठी मी तो चित्रपट अनेकदा पाहिला आहे. त्यात विद्याने चेह-यावर जराही संकोच न दाखविता केलेलं धाडसी अंगप्रदर्शनही थक्क करणारं आहे.” ती सांगते, “मादकता आणि बीभत्सता यांतील सीमारेषा फारच धूसर असते. पण त्या चित्रपटात त्यातील अंतर कायम राखण्यात विद्या यशस्वी ठरली आहे. मी त्याच भूमिकेवरून प्रेरणा घेऊन माल्दावालीची भूमिका मादकतेने साकारण्याचा प्रयत्न करते आहे.”