Join us

छोट्या पडद्यावरील कलाकार रंगले नवरात्रौत्सवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 12:34 PM

नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. छोट्या पडद्यावरील कलाकार ही यात मागे नाहीत ते देखील नवरात्रीच्या उत्साहात सहभागी झाले आहेत. 

ठळक मुद्देनवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे

नवरात्रौत्सवाला सगळीकडे मोठ्या दिमाखात सुरूवात झाली आहे. छोट्या पडद्यावरील कलाकार ही यात मागे नाहीत ते देखील नवरात्रीच्या उत्साहात सहभागी झाले आहेत. 

सिलसिला बदलते रिश्तों का मधील द्राष्टी धामी ऊर्फ नंदिनी ठाकूरः “मी गुजराथी असल्यामुळे नवरात्री हा माझ्यासाठी अतिशय विशेष सण आहे, मी दांडीया खेळत आणि गरब्याच्या चाली ऐकतच मोठी झाले आहे. मला छान कपडे घालून रात्री बाहेर जाऊन डान्स करायला आणि माझ्या घरी बनविलेली मिठाई चाखायला खूप आवडते. गा, नाचा आणि साजरे करा! मी सर्वांना आनंदी नवरात्रीच्या शुभेच्छा देते.”

दास्तान-ए-मोहब्बत सलीम अनारकली मधील गुरदीप कोहली उर्फ जोधा बाई: “नवरात्री म्हणजे डान्स आणि रंगाची उधळण असते आणि मला त्याची अत्यंत आवड आहे! मी नेहमी वाट पहात असलेल्या उत्सवांमधील हा एक आहे! असे म्हणतात की नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाचा एक रंग असतो आणि त्याचा विशिष्ट अर्थ असतो, त्यामुळे मी प्रत्येक दिवशी घरातून बाहेर पडताना तो रंग घालण्याचा प्रयत्न करते. तसेच माझे चित्रीकरण संपल्यानंतर मी बनविलेले जेवण आवडणाऱ्या माझ्या मित्रांसाठी आणि कुटुंबासाठी काहीतरी विशेष बनविण्याचा प्रयत्न करते. नवरात्रीच्या या नऊ रात्री डौलदारपणा, आनंद आणि गंमत घेऊन येवोत अशी शुभेच्छा. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा”

इश्क में मरजावा मधील अर्जुन बिजलानी ऊर्फ दीप रायचंदः “मला मित्रांच्या आणि कुटुंबाच्या जवळ घेऊन जाणारा हा उत्सवांचा आणि साजरे करण्याचा कालखंड आहे. या 9 दिवसांत माझी बायको आणि मी मंदिरात जातो आणि आमच्या घरी सुध्दा पूजा असते. आम्ही आमचे घर स्वच्छ करतो आणि बेडशीटपासून ते पडद्यां पर्यंत सर्व काही बदलतो कारण आम्ही आमच्या घरात शक्ती व सामर्थ्याच्या देवतेचे स्वागत करत असतो. हा माझ्या वरील नवरात्रीचा धार्मिक संस्कार आहे. यानवरात्रीला मी माझ्या सर्व चाहत्यांना आनंद, आरोग्य आणि भरभराट होवो अशी शुभकामना व्यक्त करतो!”

इंटरनेट वाला लव्ह मधील शिवीन नारंग ऊर्फ जय मित्तलः “मला लहानपणापासून आवडणारा हा सण आहे. मी दिल्लीचा आहे आणि माझ्या या शहरात नवरात्री हा सण खूप मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. घरी नेहमीच पूजा असते आणि माझी आई सर्वांसाठी हलवा आणि पुरी बनवते. मी याआधी नऊ दिवस उपवास करत असे पण आता माझ्या व्यवसायामुळे मी मुंबईत एकटाच असल्यामुळे आता फक्त पहिल्या आणि नवव्या दिवशी उपवास करतो. यावेळी सादर करण्यात येणाऱ्या रामलीलेचेही मला अतिशय आकर्षण वाटते. तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.”

टॅग्स :नवरात्रीदृष्टि धामी