Join us

डिलीव्हरी होताच थेट हॉस्पिटलमधून शूटिंगसाठी गेली होती स्मृती ईराणी, कारण वाचून व्हाल हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2020 4:03 PM

कता कपूरची  मालिका 'सास भी कभी बहु थी 'या सास बहु मालिकेमुळे ती घराघरांत पोहचली. याच मालिकेने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली नंतर स्मृतीने तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही.

स्मृती इराणी आज भारतीय राजकारणी आहेत. पण एकेकाळी तिने टीव्हीच्या दुनियेत राज्य केले. स्मृती इराणी यांनी अभिनय कारकीर्दीच्या सुरुवातीला 'आतिश', 'हम हैं कल आज और कल', 'कविता' यांसारख्या कार्यक्रमांमध्ये काम केले. 

पण एकता कपूरची  मालिका 'सास भी कभी बहु थी 'या सास बहु मालिकेमुळे ती घराघरांत पोहचली. याच मालिकेने तिला भरपूर प्रसिद्धी मिळवून दिली नंतर स्मृतीने तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. या मालिकेत तिने तुलसी मिहिर विरानी ही भूमिका साकरली होती. आजही रसिक तिच्याया भूमिकेला विसरलेले नाहीत. स्मृती ईराणीला आजही तुलसी म्हणून जास्त ओळखतात.

उत्कृष्ट अभिनयामुळे स्मृती सर्वाधिक लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री बनली. ही भूमिका उत्तम साकारण्यासाठी स्मृतीनेही तितकेच परिश्रम घेतले होते. एका मुलाखती दरम्यान स्मृतीने सांगितले की, बाळाला जन्म देताच दोनच दिवसांनी शूटिंगसाठी गेली होती.स्मृती म्हणाली होती, माझ्या पहिल्या गर्भधारणेदरम्यान मी अजिबात आराम केला नव्हता. कामातच असताना पोट दुखू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले. 

दुसर-याच दिवशी सकाळी ६ वाजता प्रोडक्शन टीमने तिला ६ वाजता शूटिंगसाठी फोन केला तेव्हा तिने सगळ्यांना बाळाच्या जन्माची गुड न्यूज दिली. त्यानंतर स्मती यांच्या पतीने प्रॉडक्शन टीमला दोन दिवस शूटिंग करू शकणार नसल्याचे सांगितले.

तेव्हा प्रोडक्शन टीमने उत्तर दिले ठीक आहे आमच्याकडे ७५ तास आहेत. डिलेव्हरीनंतरही एकताने मला शूटिंगला बोलावले. शूटिंगच्या वेळी आम्ही अशक्य असलेली प्रत्येक गोष्ट शक्य करून दाखवली. 

टॅग्स :स्मृती इराणी