Join us

स्नेहल शिदम ठरली 'चला हवा येऊ द्या - होऊ दे व्हायरल' पर्वाची विजेती

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2019 10:53 AM

महाअंतिम सोहळ्यात झी मराठीवरील काही कलाकारांनी देखील हजेरी लावली. होऊ दे व्हायरल हे पर्व संपले पण आता पुढे काय हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाला असताना त्याच उत्तर देखील कालच्या महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांना मिळालं.

''कसे आहात मंडळी, हसताय ना, हसायलाच पाहिजे'', असं म्हणत गेली चार वर्षे  ‘चला हवा येऊ द्या’हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र तसेच जगभरातील मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आत्ता पर्यंतच्या प्रवासात चला हवा येऊ द्या मध्ये प्रेक्षकांनी महाराष्ट्र दौरा, भारत दौरा आणि विश्व दौरा यांचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात नावीन्य म्हणून चला हवा येऊ द्या चे पर्व होउ दे व्हायरल प्रेक्षकांच्या भेटीस आले. या पर्वात तुमच्या आमच्या सारख्या सामान्य लोकांनी प्रेक्षकांना हसवण्याचा विडा उचलला आणि त्यात सर्व स्पर्धक यशस्वी ठरले.

या स्पर्धकांच्या विनोदांनी संपूर्ण महाराष्ट्र हसला तर कधी कधी या हास्यसम्राटांनी त्यांच्या परफॉर्मन्समधून समाज प्रबोधन देखील केलं. महाराष्ट्राताच्या कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या २६ स्पर्धकांमधून फक्त ६ स्पर्धकांनी महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांच्या समोर त्यांची कला सादर केली. स्नेहल शीदम, अर्णव काळकुंद्री, नितीन कुलकर्णी, प्रवीण तिखे, डॉ. पूजा सदमतेला, गौरवी वैद्य या टॉप सहा स्पर्धकांपेकी प्रेक्षकांनी त्यांचा आवडता स्पर्धक निवडला आणि नुकत्याच पार पडलेल्या या महाअंतिम सोहळ्यात स्नेहल शिदम हिला होऊ दे व्हायरल या पर्वाची विजेती म्हणून घोषित करणात आलं. तसंच अर्णव काळकुंदरी याने दुसरं तर प्रवीण तिखे यांनी या स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं.  या महाअंतिम सोहळ्यासाठी आदेश बांदेकर, रवी जाधव, श्वेता शिंदे, प्रवीण तरडे, भाग्यश्री मिलिंद, अशोक शिंदे हे कलाकार या मंचावर सज्ज झाले. 

तसंच या महाअंतिम सोहळ्यात झी मराठीवरील काही कलाकारांनी देखील हजेरी लावली. होऊ दे व्हायरल हे पर्व संपले पण आता पुढे काय हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उपस्थित झाला असताना त्याच उत्तर देखील कालच्या महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांना मिळालं. तुमच्या आमच्यासारख्या लोकांनंतर आता झी मराठीचे लाडके कलाकार प्रेक्षकांना हासावण्याचा विडा उचलणार आहेत. म्हणजेच चला हवा येऊ द्याचं सिलेब्रिटी लवकरच प्रेक्षयकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वाची अधिकृत घोषणा या महाअंतिम सोहळ्यात करण्यात आली. हे पर्व देखील प्रेक्षकांच्या तितक्याच पसंतीस पडेल यात शंका नाही.

टॅग्स :चला हवा येऊ द्या