Join us

म्हणून जुही परमार,तस्निम शेख,आकाशदीप सेहगल या कलाकरांनी छोट्या पडद्यावर केले कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2017 1:15 PM

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करत कलाकार मालिकेच्या माध्यमातून रसिकांचे आवडते कलाकार बनतात. छोट्या पडदा  छोटा असला तरी ...

छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करत कलाकार मालिकेच्या माध्यमातून रसिकांचे आवडते कलाकार बनतात. छोट्या पडदा  छोटा असला तरी या कलाकरांना मोठी प्रसिध्दी हा छोटा पडदाच मिळवून देतो. म्हणूनच प्रत्येक कलाकाराला एकदा तरी त्याच्या करिअरमध्ये छोटा पडद्यावर झळकण्याची इच्छा असते. कारण मालिका विश्वामुळे हे सेलिब्रेटी घरघरात पोहचतात आणि रसिकांना आपलेसे करतात. एकाच मालिकेतून 5 ते 6 वर्ष रसिकांचे मनोरंजन करता करता रसिकांचे आणि कलाकरांचे एक अतुट असे बंध निर्माण होतात. त्यामुळे काही वर्ष अभिनयापासून ब्रेक घेतलेल्या  कलाकरांना पुन्हा एकदा छोटा पडदा खुनावू लागतो. अनेक वर्ष ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करणा-या कलाकरांचा घेतलेला हा आढावा. जुही परमारसगळ्यात आधी जुही परमारचा उल्लेख करावा लागेल. तब्बल 7 वर्ष कुमकुम मालिकेतून तिने कुमकुम या भूमिकेतून तिने रसिकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. एकच मालिका जी 7 वर्ष सुरू होती. त्यानंतर कुमकुम मालिका संपली आणि त्यानंतर जुही संसारता रमली. 2009मध्ये अभिनेता सचिन श्रॉफसोबत लग्न केले. लग्न झाल्यानंतर जुहीने मालिकेत काम करण्याचे प्रमाण खूपच कमी केले होते. ती लग्नानंतर ये चंदा कानुन है याच मालिकेत दिसली. त्यानंतर गेल्या सहा-सात वर्षांपासून ती कोणत्याच मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकली नाही. ती दरम्यानच्या काळात संतोषी माँ, तेरे लिये या मालिकांमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत केवळ एका भागासाठी दिसली होती. लग्नानंतर तिने पती पत्नी और वो या एक रिअॅलिटी शोमध्ये सचिनसोबत भाग घेतला होता. तसेच 2012ला ती बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेली होती. या कार्यक्रमाचे विजेतेपददेखील तिने मिळवले होते. मात्र कुमुकम प्रमाणे कोणत्याही मालिकेत ती सलग झळकली नाही. आता अनेक वर्षांनंतर जुही  शनी कर्मफलदाता या मालिकेतून कमबॅक केले आहे.जुही या मालिकेत संग्या आणि छाया अशा दोन भूमिका साकारत आहे.किर्ती गायकवाडसात वर्षांपूर्वी रसिकांनी किर्तीला सात फेरे, छोटी बहू आणि डान्स रियालिटी शो नच बलियेमध्ये पाहिलंय. अनेक मालिकांमध्ये किर्तीने निगेटिव्ह शेड असलेल्या भूमिकाही साकारल्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून किर्तीला छोट्या पडद्यावर कमबॅक करायचे होतं. मात्र किर्ती एका चांगल्या भूमिकेच्या प्रतीक्षेत होती. ससुराल सिमर का या मालिकेतून किर्तीचं तब्बल सात वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन होतंय.आकाशदीप सेहगल'क्योंकी साँस भी कभी बहु थी' या लोकप्रिय मालिकेत अंश या भूमिकेव्दारे घराघरात पोहचला. या मालिकेनंतर वेगवेगळ्या शोमधून तो छोट्या पडद्यावर झळकत राहिला. कुसुम, कुछ इस तरह,कहानी हमारे महाभारत की,तसे फिअर फॅक्टर,झलक दिखला जा 1पर्व,कॉमेडी सर्कसचे 2 पर्व तसेच 2011मध्ये तो बिग बॉसच्या 5व्या पर्वातही झळकला होता.आता पुन्हा आकाशदीप सैगलने  तब्बल  5 वर्षानंतर  ‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे. या मालिकेत मी पीर मुहम्मदची व्यक्तिरेखा साकारीत असून ती रणजितसिंग यांच्या कथेचा अगदी अविभाज्य भाग आहे. मानसी जोशी रॉयसाया या मालिकेतील सुधा या भूमिकेला  आजही रसिक विसरलेले नाहीत.मानसीने  घरवाली उपरवाली, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये झळकली होती. गेल्या अनेक वर्षांपासून ती छोट्या पडद्यापासून दूर आहे. पण आता 'ढाई किलो प्रेम' या मालिकेद्वारे ती छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. मानसीने तिच्या अभिनय कारकिर्दीत वेगवेगळ्या कारणांमुळे अनेकवेळा ब्रेक घेतले.लग्न झाल्यानंतर मानसीने काही वर्षांचा ब्रेक घेतला त्यात मुलगी लहान असल्याने तिने अभिनयापासून दूर राहाणेच पसंत केले. नंतर मुलगी तीन वर्षांची असताना तिने 'कुसूम' ही मालिका केली. ही मालिका संपल्यावर लगेचच ती रोहितसोबत नच बलियेमध्ये झळकली.त्यानंतर तिने कॅमेऱ्याच्यामागेच राहात प्रोडक्शन हाऊसचे काम सांभाळले.मात्र तिने पुन्हा अभिनय करावा अशी तिचा पती रोहित रॉयचे मत असल्याने तो नेहमीच तिला  प्रोत्साहन देत असे.त्यामुळेच ती पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे.तस्निम शेख'एक विवाह ऐसा भी' मालिकेतून टीव्ही अभिनेत्री तस्निम शेखने  नऊ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक केले आहे.क्योंकी सास भी कभी बहू थी या मालिकेतील मोहिनी या भूमिकेमुळे तस्नीम शेखला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या मालिकेप्रमाणेच तिने कुमकुम, कुसुम यांसारख्या मालिकांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तस्नीमने लग्नानंतर मुलीमध्ये रमली.अनेक ऑफर्स येऊनही तिने त्या सिवकारल्या नाहीत. मुलीकडे दुर्लक्ष होवू नये म्हणूनच  मालिकेत काम करायचेच नाही असे तिने ठरवले होते.आता मुलगी मोठी झाल्यामुळे ती पुन्हा एकदा  छोट्या पडद्याकडे वळली.