म्हणून मेघा चक्रवर्ती शिकली बाईक चालवायला !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2018 9:55 AM
कलाकारांना ब-याचदा भूमिकेसाठी काही गोष्टी गोष्टी शिकाव्या लागतात.कधी कोणत्या मालिकेसाठी कोणता सीन करावा लागणार हे तर काही सांगता येत ...
कलाकारांना ब-याचदा भूमिकेसाठी काही गोष्टी गोष्टी शिकाव्या लागतात.कधी कोणत्या मालिकेसाठी कोणता सीन करावा लागणार हे तर काही सांगता येत नाही.मालिकेच्या कथेनुसार कलाकार आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकताना दिसतात.कधी ते घोडेस्वारीचे प्रशिक्षण घेतात तर कधी तलवारबाजी करण्याचे. अगदी त्याचप्रमाणे कृष्णा चली लंडन मालिकेच्या एका भागात मेघाला बाईक चालवायचा सिक्वेस होता.मात्र तिला बाईक चालवायला येत नाही.कथेच्या मागणीनुसार आणि आपली भूमिका अधिकाधिक वास्तवदर्शी ठरावी यासाठी तिने बाईकही चालवायचे प्रशिक्षण घेतले.या मालिकेत कृष्णा ही व्यक्तिरेखा मेघा चक्रवर्ती साकारत आहे. मोटरबाईक चालविणे हे मेघासाठी तसे थोडे कठिणच होते.तेव्हा मेघाने आधी काही दिवस बाईक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आणि त्याचा चांगला सराव केला. या अनुभवाविषयी मेघा म्हणाली, “मला दुचाकी वाहनांची खूप भीती वाटते.मी जेव्हा अनेक मुलींना स्कुटी चालवताना पाहते.तेव्हा मलाही त्यांच्या प्रमाणे स्कुटी चालवावी अशी इच्छा होते.त्याच स्कुटी नाही थेट बाईकच चालवायची म्हटल्यावर चालविण्यास शिकताना मी त्यावरून पडेन आणि मला दुखापत होईल, अशी मला भीती वाटत होती. पण मला विश्वास होता अशक्या अशी कोणतीच गोष्ट नाही त्यानुसार मी आठ दिवसात बाईक चालवायला शिकले. मुळात एरव्ही कधीही स्कुटीसुद्धा न चालवणारी मी आज थेट बाईक चालवते.यावर माझा स्वतःच विश्वासच बसत नाही.हा अनुभव मला रिल लाईफसाठीच नाहीतर रिअल लाईफसामध्येही खूप फायदेशीर ठरणार आहे.cnxoldfiles/a>या मालिकेने तिला तिच्या करिअरमध्ये पुढचा टप्पा गाठण्यासाठी खूप चांगले अनुभव दिल्यामुळे ती निर्मांत्यांचेही खूप आभारी असल्याचे तिने म्हटले आहे.