छोट्या पडद्यावरील 'माझी तुझी रेशीमगाठ'(Majhi Tujhi Reshimgath) ही मालिका रसिकांना चांगलीच भावली आहे.या मालिकेत समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे( sankarshan karhade) साकरतोय. संकर्षण साकारत असलेली समीरची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते आहे. याशिवाय संकर्षण झी मराठीवरील किचन कल्लाकार या शोचे सूत्रसंचालन करताना ही दिसतोय, मात्र मागील आठवड्यात संकर्षणच्या जागी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करताना श्रेया बुगडे दिसली होती.
तेव्हा संकर्षणने हा शो सोडला असा प्रश्न प्रेक्षकांना पडला होता. आता या प्रश्नाचं उत्तर स्वत: संकर्षणने लोकमतशी बोलताना दिलंय. संकर्षण म्हणाला, किचन कल्लाकरचं शूट आधीच ठरलं होते आणि त्यात येणाऱ्या पाहुण्याच्या तारखाही फिक्स झाल्या होत्या. त्याचवेळी त्याला मराठवाडा दौरा लागला होता त्यामुळे त्याच्या एकट्यासाठी सगळं शेड्यूल थांबवणं शक्य नाही. त्यामुळे दोन दिवस शूटिंग श्रेया बुगडेने केलं.
‘माझीया प्रियाला’ आणि ‘आभास हा’ या मालिकांमध्ये संकर्षणने काम केले आहे. झी मराठीवरील ‘रामराम महाराष्ट्र’चे सूत्रसंचालनही त्याने केलं. यासोबतच लोभ असावा, मी रेवती देशपांडे या लता नार्वेकर यांच्या व्यावसायिक नाटकात संकर्षण होता. संकर्षण त्याच्या उत्तम अभिनयासोबतच सर्वात जास्त चर्चेत असतो ते त्याच्या जबरदस्त कवितांमुळे. त्यानं लिहिलेल्या कविता त्याच्या चाहत्यांना आणि प्रेक्षकांना नेहमीच विचांर करायला भाग पाडतात. त्याच्या लेखनीची जादू त्याच्या एका पेक्षा एक अशा लयभारी कवितांमधून पाहायला मिळते.