Join us

'सोबतीस हलके' म्हणत अरुंधती सुरु करणार आशुतोषसोबत नवा संगीतमय प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2022 18:18 IST

Aai kuthe kay karte: 'सुखाचे चांदणे' या गाण्यानंतर 'सोबतीस हलके' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आई कुठे काय करते या मालिकेने उत्तम कथानक आणि कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयामुळे अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला ही मालिका टीआरपी आणि लोकप्रियतेमध्ये प्रथम स्थानावर आहे. या मालिकेत आतापर्यंत अनेक नवीन प्रयोग करण्यात आले आहेत. यामधलाच एक प्रयोग म्हणजे सुखाचे चांदणे हे गाणं. पहिल्यांदाच एका मालिकेसाठी खास गाणं तयार केल्याचं पाहायला मिळालं. या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलात त्यानंतर आता या मालिकेत आणखी एक गाणं पाहायला मिळणार आहे.

'सुखाचे चांदणे' या गाण्यानंतर 'सोबतीस हलके' हे नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सध्या या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये आशुतोष आणि अरुंधती एकत्र मिळून हे गाणं रेकॉर्ड करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच अरुंधतीला एका सिनेमाच्या गाण्याची ऑफर मिळाली. तिच्यासोबतच आशुतोषलादेखील या सिनेमात गाण्याची संधी मिळाली. त्यामुळे ही जोडी एकत्रपणे सोबतीस हलके या गाण्याचं रेकॉर्डिंग करत आहेत. मात्र, ऐन रेकॉर्डिंग सुरु असताना अनिरुद्ध तिथे येतो आणि अरुंधतीचा सूर चुकतो. त्यामुळे आता या मालिकेत पुन्हा कोणतं नवं वळण पाहायला मिळणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिकामधुराणी प्रभुलकरटेलिव्हिजनटिव्ही कलाकार